नागपूर, 16 जुलै: गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या रडारवर आहेत. नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महाविकास आघाडीत (Maha vikas aghadi) काही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यानंतर शिवसेना (Shivsena) आणि एनसीपी (NCP) कडून पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत. आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी आज पटोले यांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले काय बोलतात त्यावर रोज आम्ही काय बोलणार? मला शोभा नाही देत. योग्य वाटत नाही. पवारांनी व्यवस्थित उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. आम्ही काँग्रेस हायकमांडचे प्रतिनिधी असलेल्या एच. के. पाटील यांच्या बोलण्याला महत्त्व देतो. बाकीचे काय बोलतात त्याला महत्त्व नाही, अशा शब्दांत पटेल यांनी पटोलेंना टोला लगावला आहे.
शरद पवार साहेब महाविकास आघाडीचे जनक आहेत. ठाकरे सरकारचे नेते आहेत, आघाडी म्हणून जे आहे त्याचे मार्गदर्शक पवारच, तेच पुढे राहतील. म्हणून बाकीचे लोक काय इकडे तिकडे बोलतात त्यावर आम्ही रोज काय उत्तर द्यायचे, असंही प्रफुल्ल पटेल म्हणालेत.
हेही वाचा- Maharashtra 10th Result: विभागानुसार दहावीच्या निकालाची टक्केवारी
नाना पटोले यांच्या काही विधानांवरून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे. पटोले यांनी स्वबळाचा नारा देताना केलेल्या काही विधानांमुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला आहे.
आता त्यांच्या पक्षात काय सुरू आहे? एच के पाटील काय बोलले, चव्हाण, थोरात भेटायला गेले होते. याचा अर्थ काय, इशारा तुम्हाला माहितीच आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. नाना पटोलेंच्या बोलण्याने खूप फरक पडत नाही पण एक आहे की तो एक मीडिया इव्हेंट झाला आहे. मला काँग्रेस म्हणून एच के पाटील प्रभारी काय म्हणतात हे जास्त महत्वाचे आहे, त्यात जास्त तथ्य असतं कारण ते थेट हाय कमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात, असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा- मोठी बातमी: तब्बल 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, हे आहे कारण
मला शिवसेनेत कोण नाराज आहे हे माहिती नाही, आमच्या पक्षात कोणी नाराज नसल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.