Home /News /pune /

पुण्यात इन्फोसिसच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; राहत्या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून मारली उडी

पुण्यात इन्फोसिसच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; राहत्या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून मारली उडी

Coronavirus चा विळखा आणि लॉकडाऊनच्या बातम्यांमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे वाकड परिसरात खळबळ उडाली.

पुणे, 28 एप्रिल : Coronavirus चा विळखा आणि लॉकडाऊनच्या बातम्यांमध्ये एक धक्कादायक बातमी आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या वाकड इथे राहणाऱ्या आणि मोठ्या नामांकित कंपनीत नोकरीला असणाऱ्या एका संगणक अभियंत्याने राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रसूनकुमार झा हे या अभियंत्याचं नाव आहे. 28 वर्षीय प्रसूनकुमार हे राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये नोकरीला होते. इन्फोसिसमध्ये सॉ़फ्टवेअर इंजिनिअर म्हणून ते कार्यरत होते, अशी माहिती वाकड पोलीस ठाण्यातून देण्यात आली. वाकडच्या लॉरेल सोसायटीत राहणारे झा मुळचे बिहारच्या दरभंगाचे होते. त्यांनी याच राहत्या सोसायटीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गेली काही वर्षं झा याच परिसरात राहात होते. त्यांनी नेमक्या कुठल्या कारणामुळे हे टोकाचं पाऊल उचललं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. वाकड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, झा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता आहे. ते पुण्यात एकटेच राहात होते. प्रेमप्रकरणातून नैराश्य आलं होतं का या बाबींवर पोलीस चौकशी करत आहेत. पिंपरी चिंचवड शहर पूर्ण लॉकडाऊनमध्ये आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी आहे. अनेक आयटी कर्मचारी घरूनच काम करत आहेत. अन्य बातम्या धक्कादायक! अ‍ॅम्ब्युलन्स नाही...मदत नाही...बापाला हातगाडीवर घेऊन धावत होता मुलगा बापरे! कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहामुळे इतरांना व्हायरसची लागण, एक चूक पडली महागात अवैध सलूनमुळे धोका वाढला, हेअर ड्रेसरला कोरोनाची लागण झाल्याने गावात खळबळ
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Suicide news

पुढील बातम्या