मराठी बातम्या /बातम्या /देश /अवैध सलूनमुळे धोका वाढला, हेअर ड्रेसरला कोरोनाची लागण झाल्याने ग्राहकांमध्ये खळबळ

अवैध सलूनमुळे धोका वाढला, हेअर ड्रेसरला कोरोनाची लागण झाल्याने ग्राहकांमध्ये खळबळ

हा हेअर ड्रेसर ग्राहकांच्या घरी जाऊनही कटिंग व शेव्हिंग करून देत होता

हा हेअर ड्रेसर ग्राहकांच्या घरी जाऊनही कटिंग व शेव्हिंग करून देत होता

हा हेअर ड्रेसर ग्राहकांच्या घरी जाऊनही कटिंग व शेव्हिंग करून देत होता

चेन्नई, 28 एप्रिल : लॉक़डाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ नये यासाठी हे आवश्यक आहे. मात्र तामिळानाडूत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील एका 32 वर्षीय तरुण बेकायदेशीरपणे सलून चालवित होता. हा तरुण दुकानात लपून-छपून काम करीत होता. अनेकदा तो ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांची हजामत करीत असे. त्याची कोविड – 19 (Covid - 19) ची तपासणी केल्यानंतर मोठा खुलासा झाला आहे. हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) असल्याची बाब समोर आली आहे.

केस कापणाऱ्या व्यक्तीकडून संसर्ग पसरत असल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने याबाबत तपास सुरू केला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात असून त्यांना क्वारंटाइन करण्याचं काम केलं जात आहे. आतापर्यंत 30 जणांबद्दल माहिती मिळाली असून त्यांनी या सलूनमधून केस कापले आहेत. या न्हाव्यावर कोणताही गुन्हा दाखल केला की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

यापूर्वी मध्य प्रदेशातील न्हाव्याने एका संक्रमित कपड्याचा वापर विविध ग्राहकांसाठी (शेव्हिंग-कटिंग) केला होता. त्यानंतर 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. देशभरात सलूनची दुकाने सध्या बंद आहेत. अशा परिस्थिती लोक अवैधपणे सुरू असलेल्या दुकानातून केस कापत आहेत. मात्र सरकारकडून वारंवार नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची सूचना दिली जात आहे. यासाठी सरकारकडून अनेक भागांमध्ये हॉटस्पॉट उभारण्यात आले आहेत.

संबंधित -पुन्हा एकदा मृत्यूचं थैमान! 'दारू' प्यायल्याने गेला 728 जणांचा बळी

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; शेकडो मजुरांचा आक्रोश

 

First published:
top videos