Home /News /national /

अ‍ॅम्ब्युलन्स नाही...मदत नाही...बापाला हातगाडीवर घेऊन धावत होता मुलगा, ह्रदयाचा ठोका चुकवणारी घटना

अ‍ॅम्ब्युलन्स नाही...मदत नाही...बापाला हातगाडीवर घेऊन धावत होता मुलगा, ह्रदयाचा ठोका चुकवणारी घटना

या दोन किलोमीटरमध्ये त्याला अनेक पोलिसही भेटले. मात्र कोणीच मदतीसाठी आलं नाही.

    कोटा, 28 एप्रिल : राजस्थानमधील कोटामध्ये कोरोनादरम्यान (Coronavirus) एक अमानवीय चेहरा समोर आला आहे. आजारी वडिलांना हातगाडीवर घेऊन मुलगा तब्बल 2 किमी धावत होता. मात्र कोणीच मदतीला आलं नाही. रस्त्यात राजस्थान पोलिसांची बॅरिकेडिंगदेखील होती. मात्र कोणताही पोलीस मदतीसाठी आला नाही. निराधार मुलगा कधी हातगाडीवर झोपवलेल्या वडिलांना सांभाळत होता तर कधी रस्त्यामध्ये येणारं बॅरिकेडिंट हटवत होता. यादरम्यान पोलीस कर्मचाऱी त्याला भेटले मात्र कोणी मदतीसाठी आलं नाही. यावेळी त्या मुलाला माणुसकी हरपल्यासारखे वाटले. यापेक्षाही जेव्हा रुग्णालयात पोहोचल्यानंतरही डॉक्टर त्या मुलाला या खोलीतून दुसऱ्या खोलीत धावाधाव करायला लागत होती तेव्हा त्याचा बांध सुटला. मुलाने वडिलांचा वाचविण्याचा प्रयत्न केला, पण... मृतांचा मुलगा मनिष याने सांगितल्यानुसार, रुग्णालय प्रशासन कधी 125 खोलीत तर कधी 104 खोलीत पाठवत होते. शेवटी 104 क्रमांकाच्या ओपीडीत पाठविले. जेथे इसीजी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आपात्कालिन ते ओपीडीपर्यंत सुरू होती धावाधाव यावेळी मुलाने वडिलांसोबत झालेल्या वागणुकीबद्दल राग व्यक्त केला. रुग्णालयाकडून रुग्णवाहिकाही देण्यात आली नाही, शिवाय रस्त्यांमध्ये भेटलेल्या पोलीस मदतीसाठी पुढे आले नाही, अशी त्याने तक्रार केली आहे. रामपुरा फतेहगढीमधील हनुमान मंदिराजवळ राहणाऱे सतीश अग्रवाल बाथरुमला जात असताना दम्यामुळे चक्कर येऊ खाली कोसळले. तेव्हा त्यांची पत्नी गायत्री आणि मुलगा मनीष अग्रवाल यांनी 108 रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र दीड तासांपर्यंत रुग्णवाहिका आली नाही. त्यानंतर त्यांनी वडिलांना हातगाडीवर झोपवलं आणि रुग्णालयाच्या दिशेने धावत सुटला. मात्र रुग्णालयात इसीजी काढल्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला. संबंधित-अवैध सलूनमुळे धोका वाढला, हेअर ड्रेसरला कोरोनाची लागण झाल्याने गावात खळबळ
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या