Home /News /pune /

जबाबदार कोण? पुण्यात 3 दिवसांत 4 होम क्वॉरंटाइन कोरोना रूग्णांचा मृत्यू

जबाबदार कोण? पुण्यात 3 दिवसांत 4 होम क्वॉरंटाइन कोरोना रूग्णांचा मृत्यू

मागणी आणि पुरवठा यात अजूनही मोठी तफावत असल्यानं रूग्णांना वेळेवर रेमडेसीवीरचे इंजेक्शन मिळत नसल्याची स्थिती आहे.

पुणे, 12 एप्रिल : पुण्यात (Pune) केवळ वेळेत बेड उपलब्ध झाले नसल्यामुळे 51 वर्षीय कोरोनाबाधित (corona patients ) व्यक्तीचा घरातच दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ बेड्स मिळत नाही म्हणून होम क्वारंटाइनमध्ये (Home quarantine) असलेल्या कोरोना रूग्णाचा घरातच मृत्यू झाल्याची ही तीन दिवसांतील चौथी घटना आहे. त्यामुळे पुण्यातील आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुरती कोसमडून पडल्याचं स्पष्ट झालंय. सोमवारी औंधमधील आंबेडकर वसाहतीत संतोष ठोसर यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासाठी बेड मिळावा म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी महापालिकेच्या हेल्पलाईनवरही त्यांनी संपर्क साधला. तरीही त्यांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आयसीयू किंवा व्हेंटिलेटर बेड मिळू शकला नाही. अखेर पहाटे 2 वाजेच्या सुमारास त्यांचा घरातच मृत्यू झाला. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजार पार, 258 जणांचा मृत्यू सहकारनगरमध्येही एका वृद्धाचा घरातच कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याशिवाय 2 दिवसांपूर्वी कर्वेनगरमध्येही एका कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याची पत्नी बेशुद्ध पडली होती. त्या महिलेला स्थानिक नगरसेवक दीपक मानकर यांनी तात्काळ नायडू हॉस्पिटल मध्ये हलवून कसंबसं वाचवलं. मात्र ही परिस्थिती सुधारली नाही, तर पुण्यातील होम क्वॉरंटाइन रूग्णांमधील मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतं आहे. IPL 2021 : टी-20 मध्ये अर्धशतकही नाही, पण पोलार्डशी तुलना, आता पंजाबकडून मैदानात सध्या पुण्यात 52 हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 12 हजार रूग्ण विविध हॉस्पिटलमधे उपचार घेत आहेत. तर तब्बल 30 हजारांपेक्षा अधिक रूग्ण होम क्वॉरंटाइन म्हणजेच घरातच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. अशा रुग्णांची प्रकृती अचानक खालावते तेव्हा नातेवाईकांकडून त्यांना रूग्णालयात हलवण्याचा प्रयत्न होतो, पण दुर्दैवाने अनेकांना बेड्सच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पालिकेनं तत्काळ ऑक्सीजन बेड्स, आयसीयू आणि व्हेंटीलेटर बेड्स वाढवावे, अशी मागणी पुणे मनपाचे काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी केली. दुसरीकडे पुण्यात रेमडेसीवीर इंजेक्शनसाठीची वणवण अजूनही सुरूच आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. पण मागणी आणि पुरवठा यात अजूनही मोठी तफावत असल्यानं रूग्णांना वेळेवर रेमडेसीवीरचे इंजेक्शन मिळत नसल्याची स्थिती आहे. ही परिस्थिती आटोक्यात यायला आणखी किमान चार-पाच दिवस तरी लागलीत, असं अन्न व औषध प्रशासनानं सांगितलं आहे. मात्र त्यामुळे यादरम्यान अनेक रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Coronavirus, Death, Home quarantine, Pune

पुढील बातम्या