जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / maharashtra corona case : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजार पार, 258 जणांचा मृत्यू

maharashtra corona case : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजार पार, 258 जणांचा मृत्यू

maharashtra corona case : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजार पार, 258 जणांचा मृत्यू

आज राज्यात 51,751 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 258 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित ( maharashtra corona case) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज 50 हजारांच्या पुढे नवीन कोरोनाबाधित (Corona) रुग्ण आढळून येत आहे. आजही राज्यात 51,751 कोरोनाबाधित रुग्णांचा भर पडला आहे. तर 258 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारकडून गेल्या 24 तासांतील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी राज्यात 60 हजारांहुन अधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज मात्र रुग्ण संख्या कमी झाली आहे. राज्यात आतापर्यंत  5,64,746 एक्टिव्ह रुग्ण संख्या झाली आहे. आज 52,312 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 28,34,476 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे (Recovery Rate) 81.94 एवढे झाले आहे. Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, पाहा काय आहे लेटेस्ट गोल्ड रेट आज राज्यात 51,751 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  तर 258 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.68 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,23,22,393 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34,56,996 (14.49 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 32,75,224 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,399 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया – मुख्यमंत्री दरम्यान, कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रुग्णालयाच्या दारातच गाडीमध्ये सोडला जीव, अहमदनगरमधील मन हेलावून टाकणारी घटना ‘कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे. आरोग्य सेवक, परिचारीका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबुया.  नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजुला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करूया. गर्दी नकोच, मास्क अनिवार्य आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची गुढी यावर्षी महत्वाची आहे. यातून येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: covid-19
  • First Published :
जाहिरात
जाहिरात