Home /News /pune /

पुण्यात जुलै महिन्यात दिसला कोरोनाचा हाहाकार, लॉकडाऊन असूनही वाढली धक्कादायक आकडेवारी

पुण्यात जुलै महिन्यात दिसला कोरोनाचा हाहाकार, लॉकडाऊन असूनही वाढली धक्कादायक आकडेवारी

जुलै महिन्यामध्येही राज्यात लॉकडाऊन होतं. पण यावेळी अनेक नियम नागरिकांसाठी शिथिल करण्यात आले.

पुणे, 31 जुलै : राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आकड्यांमुळे लॉकडाऊनही 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलं आहे. जुलै महिन्यामध्येही राज्यात लॉकडाऊन होतं. पण यावेळी अनेक नियम नागरिकांसाठी शिथिल करण्यात आले. त्यामुळे जुलै महिन्यात कोरोना संसर्ग वाढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात जुलै महिन्यात करोना संसर्ग सर्वाधिक वाढला आहे. एकट्या जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यात तब्बल 55,584 नवे करोनाचे रुग्ण सापडले आहेत. आधीच्या संख्येपेक्षा हा आकडा मोठा आहे. तर ऑगस्टमध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 30 जून या दिवशी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 22,429 एवढी होती. तर 29 जुलै या दिवशी जिल्ह्यातील रुग्णसंख्या 78,013 एवढी झाली. म्हणजेच एकट्या जुलै महिन्यात जिल्ह्यातील नवीन 55,584 जणांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आलं आहे. मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय अशात हा शहरात सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा परिणाम असल्याचं प्रशासकीय यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे ऑगस्ट महिन्यात या साथीचा कळस पाहायला मिळणार असल्याचा तर्कही तज्ञाकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम पाळा आणि आवश्यक असल्यासच घराच्या बाहेर पडा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुण्यात कोरोनाला हरवण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि मागण्या केल्या. एका मुलासह 2 मुलींनी क्षणात गमावला जीव, खेळताना घडली धक्कादायक घटना 1. खाजगी हॉस्पिटल, बेड्स आणि अवाजवी बील 2. महापालिका आर्थिक स्थिती 3. कोरोनाबाधित रुग्णांचा आगामी अंदाज... 4. मृत्यूंचे प्रमाण व अवस्था... 5. टेस्टिंग क्षमता वाढविणे
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Lockdown, Pune, Pune news

पुढील बातम्या