एका मुलासह 2 मुलींनी क्षणात गमावला जीव, खेळताना घडली धक्कादायक घटना

एका मुलासह 2 मुलींनी क्षणात गमावला जीव, खेळताना घडली धक्कादायक घटना

मुलं खेळत असताना असं काही झालं की एका क्षणात तिघांचाही झाला मृत्यू...

  • Share this:

उस्मानाबाद, 31 जुलै : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे राज्यात अजूनही लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनदरम्यान, अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. उस्मानाबादमध्ये 1 शाळकरी मुलगा व दोन मुलीचा पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एकावेळी तीन मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,

तालुक्यातील कोळसूर कल्याणीच्या दयानंदनगर तांडाच्या शिवारात फिरत गेलेल्या दोन मुली व एका शाळकरी मुलाचा रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या कामासाठी मुरुम काढलेल्या खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रतीक्षा पवार (12 ), ओंकार पवार(12), अंजली राठोड (13) अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावं आहेत.

शे किंवा हजार नाही; तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाखांचं बिल

उमरगा तालुक्यातील कोळसूरच्या दयानंदनगर तांड्यावरील तीन मुले गुरूवारी दुपारी रस्त्याने फिरत गेली होती. त्यामध्ये किसन राठोड यांची भाची प्रतीक्षा मधुकर पवार (वय 12) ही लॉकडाऊन काळात पुणे येथून गावाकडे आली होती. हिच्यासह ओंकार राजुदास पवार (वय 12) व अंजली संतोष राठोड (वय 13) हे दोघे तुरोरी इथल्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण घेत आहेत.

हे तिनही मुले गुरुवारी दुपारी गावातील रस्त्याने फिरत गेले असता शिवारातील रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यामध्ये पडली. त्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती मिळताच उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, बीट अंमलदार वाल्मिक कोळी यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

कोरोनाबाधित महिलेचा घरातच झाला मृत्यू, तब्बल 6 तास पडून होता मृतदेह

पोलीस व ग्रामस्थांच्या सहकार्याने चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून तिथे उभ्या असणाऱ्या ग्रामस्थांचे ही डोळे पाणावले. तीनही मुलांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून दरम्यान संतोष यमाला राठोड यांच्याकडून पोलिसात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी रात्री उशीरा रस्त्याचे काम करणारी टीबीआय कंपनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 31, 2020, 7:38 AM IST

ताज्या बातम्या