जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / pune by-poll election : मतदानासाठी पैसे घेतले नाही, भाजपच्या माजी नगरसेवकाने केली मारहाण

pune by-poll election : मतदानासाठी पैसे घेतले नाही, भाजपच्या माजी नगरसेवकाने केली मारहाण

गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिकांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या धरला होता. अखेर...

गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिकांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या धरला होता. अखेर...

गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिकांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या धरला होता. अखेर…

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 26 फेब्रुवारी : पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पण मतदानाला अवघे काही तास उरले असताना पुण्यातील गंजपेठ भागात भाजपच्या माजी नगरसेवकाने पैसे घेतले नाही म्हणून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंजपेठ भागातील sr no. 630 गंजपेठ भागात भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांनी नागरिकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुपारच्या दरम्यान पैसे वाटत असताना हरिहर यांना स्थानिकांनी हटकले होते. त्यामुळे बदला घेण्याच्या भावनेने रात्री 25 ते 30 लोक घेऊन गंजपेठ 630 येथे राहणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत मारहाण केली. अशी माहिती तिथे राहणाऱ्या नागरिकांनी आणि काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी दिली. रमेश बागवे यांच्या सांगण्यानुसार, या प्रकरणी पोलिसात तक्रार देऊन पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. (pune by poll election : पुणेकरांचा कौल कुणाला? कसबा आणि चिंचवडमध्ये मतदानाला सुरुवात) ‘630 कसबा या भागामध्ये भाजपचे नागरसेवा व त्यांच्या साथीदारांनी पैसे वाटाना विरोध केल्या प्रकरणी बेदम मारहाण केली आहे. आमच्या महिला भगिनीला लाथा-बुक्काने मारहाण केली आहे. हा प्रकार निंदनीय आहे. त्यासोबत जातीवाचक शिव्या दिल्या आहेत. तुम्हाला हिते राहण्याचा अधिकार नाही अश्या धमक्या दिल्या आहेत. या बाबत पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे, आणि वरिष्ठ अधिकारी गुन्हा दाखल करण्याच काम करत आहे, अशी माहिती रमेश बागवे यांनी दिली. (चुकीला माफी नाही! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदे गटात प्रवेश) दरम्यान, गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिकांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या धरला होता. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाा आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात