मुंबई, 26 फेब्रुवारी : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. आता मुंबईच्या भायखळ्यातील दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. महत्त्वाचं म्हणजे यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा समावेश आहे. प्रदिप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी वर्षा निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला. प्रदिप गवळी, माजी नगरसेविका वंदना प्रदीप गवळी यांच्यासहीत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/4m0fLZRBX4
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 25, 2023
लोकांना हवी असलेली या भागातले प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम तुमच्या मार्गदर्शनाखाली तिथे केले जाईल. हा विश्वास आपल्याला मी देऊ इच्छितो. गेल्या सहा-सात महिन्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा सरकार आपण स्थापन केल्यानंतर या राज्यातल्या अगदी जिल्हा जिल्ह्यातून तालुका तालुक्यातून शहरातून अनेक लोक अनेक कार्यकर्ते विविध पक्षातले पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहे. एवढेच नाही तर राज्याच्या बाहेरचे देशभरातले देखील आपले कार्यकर्ते पदाधिकारी राज्य प्रमुख हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वांना प्रवेश दिला. (pune by poll election : पुणेकरांचा कौल कुणाला? कसबा आणि चिंचवडमध्ये मतदानाला सुरुवात) ‘ज्या विश्वासाने तुम्ही सोबत येत आहे तो विश्वास बिलकुल सार्थ ठरवण्याचे काम आपले सर्व कार्यकर्ते करतील अशी खात्री देखील आपल्याला देतो. हे सरकार सर्व सामान्य लोकांचे सरकार या राज्याला पुढे घेऊन जाणार सरकार आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास करणारे सरकार आहे. (‘प्रकाश आंबेडकर म्हणजे बुचकळ्यात पडलेलं..’ भाजप नेत्याचा थेट हल्ला म्हणाले, आधी MIM अन् आता..) तुम्ही सगळेजण पाहत आहे की गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आणि मुंबई महापालिका अतिशय सदन सक्षम आर्थिक दृष्ट्या मजबूत असताना देखील मुंबई महापालिकेचे बजेट जे आहे. ते एखाद्या राज्याच्या एवढा बजेट आहे. परंतु गेल्या अनेक वर्ष माझ्यापेक्षा तुम्ही साक्षीदार आहात, असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.