पुणे, 26 फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महविकास आघाडीचे रवींद्र धगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत आहे. एकूण १६ उमेदवार रिंगणात आहे. कसब्यात एकूण २ लाख ७५ हजार ४२८ मतदार आहे. यात १ लाख ३८ हजार ५५० महिला तर १ लाख ३६ हजार ८७३ मतदार आहे. तर फक्त ५ तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकूण मतदार केंद्र ७६ मतदान केंद्र आहे. यात ९ मतदार केंद्र संवेदनशील आहे. मतदान सुरळीत पार पाडण्यासाटी १३०० पोलीस कर्मचारी तैनात आहे. (चुकीला माफी नाही! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदे गटात प्रवेश) पुण्यात यंदाची निवडणूक ही रंजक ठरली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर चिंचवड निवडणुकीच्या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्ष मिळून एकूण २८ उमेदवारांचं मत मतपेटीत बंद होणार आहे. तर या मतदारसंघात 5 लाख 68 हजार मतदार असून त्यापैकी कितीजण आपल्या मतदानाचा हक्क बजावतात. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.