पुणे, 27 जानेवारी : पुण्यात बोगस शाळा आढळल्याने मोठी खळबळ माजली होती. दरम्यान पुण्यात पुन्हा एकदा बोगस शाळेचा कारनामा पुढे आला आहे. शाळेच्या जागेची मान्यता प्रमाणपत्रच बोगस निघाल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. पुण्यातील बोगस शाळांविषय दररोज धक्कादायक माहिती समोर येत असल्याने पुण्यात अजूनही बोगस शाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान विभागीय आयुक्त सौरभ राव यांची जिल्हाधिकारी म्हणून स्वाक्षरी असल्याने राव अडचणीत येण्याची शक्यता आहे.
एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल हवेली तालुक्यातील चिखली येथील शाळेच्या प्रमाणपत्रावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांची स्वाक्षरी आढळली आहे. सीबीएससीचे बनावट प्रमाणपत्र बनविण्यासाठी तयार करण्यात आलं असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सही केल्याची माहिती उघड झाली आहे.
हे ही वाचा : अल्पवयीन विद्यार्थ्यांला अमानुषपणे मारहाण प्रकरण शिक्षकाला पडलं महागात, पुण्यातील घटना
मागच्या काही दिवसांपूर्वी एक-दोन नव्हे तर तब्बल 43 शाळा पुणे जिल्ह्यामध्ये बोगस आढळल्या आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती. या 43 पैकी 30 शाळा कायमच्या बंद करण्यात आल्या. या शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीवर कारवाईला सुरूवात झाली आहे. पुण्यातील ग्रामीण भागातील शाळांचा बोगसपणा उघड झाला आहे.
याशिवाय ज्या 30 शाळा अनधिकृतरित्या सुरू होत्या, त्या शाळा बंद झाल्या आहे. तसा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी दिला होता. त्यापैकी काही शाळा मूळ परवानगी ठिकाण सोडून अन्यत्र भरत असल्याचा प्रकार समोर आला होता. आता त्या मूळ पत्त्यावर भरत आहेत. तसेच इतर शाळांना शासनाची परवानगी / मान्यता नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
हे ही वाचा : कसबा, पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक महाविकासआघाडी लढणार का? अजितदादांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
या शाळांवर कारवाई
1) ऑर्चीड इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली
2) पुणे इंटरनॅशनल स्कूल, आष्टापुर मळा, लोणी काळभोर, तालुका हवेली
3) श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल वीर, तालुका पुरंदर (परस्पर स्थलांतर)
4) संकल्प व्हॅली स्कूल, उरवडे, तालुका मुळशी
5) एस. एन. बी. पी. टेक्नो स्कूल, बावधन, तालुका मुळशी
6) राहुल इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी, तालुका मुळशी
7) अंकुर इंग्लिश स्कूल, जांभे/ सांगावडे, तालुका मुळशी
8) श्री साई बालाजी पब्लिक स्कूल, दत्तवाडी नेरे, तालुका मुळशी
9) श्री. मंगेश इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, अशोकनगर, लिंगाळी रोड, तालुका दौंड (परस्पर स्थलांतर)
10) क्रेयॉन्स इंग्लिश स्कूल कासूर्डी, तालुका दौंड
11) किडझी स्कूल, शालिमार चौक, दौंड
12) सुलोचना ताई झेंडे बालविकास व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी, तालुका हवेली.
13) तक्षशीला विक्रमशिला इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, किरकटवाडी, तालुका हवेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune school, School