पुणे, 22 जानेवारी : जुन्नर तालुक्यातील आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूल आणि कॉलेजच्या आवारात अल्पवयीन विद्यार्थ्यांना शिक्षक आणि सहकारी शिपायाकडुन अमानुषपणे मारहाण प्रकरणी आळेफाटा पोलीसांत शिक्षक आणि शिपाई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविद्यालय आवारात शिक्षकांकडे पाहून शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून शिक्षक आणि शिपायाने विद्यार्थी विक्रम नवले या 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला शिवीगाळ करून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली हा मारहाणीचा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला होता.
हे ही वाचा : कसबा, पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक महाविकासआघाडी लढणार का? अजितदादांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
शिक्षकाच्या या कृत्याचा सर्वच स्थरावर निषेध व्यक्त होत असताना आळेफाटा पोलीसांत शिक्षक जयसिंग जाधव व शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे या दोघांवर भादवी कलम 323, 504, 34, सह बाल न्याय अधिनियम काळजी व संरक्षण 2015 चे कलम 75, बाल न्याय अधिनियम मुलांची काळजी व संरक्षण 2000 चे कलम 23 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील शिक्षकांनी आकरावीच्या विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सना चांगलाच संताप व्यक्त केला होता. ही घटना (दि. 21) जानेवारी घडल्याची माहिती आहे. ज्ञानमंदिर ज्युनियर कॉलेज आळे येथे हा प्रकार घडला होता. एका विद्यार्थीने शिक्षकांना शेरोशायरी केल्याने झालेल्या गैरसमजातून काही शिक्षक आणि शिपायाने मारहाण केली होती.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आज शनिवारी सकाळी काही मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. याबाबत कोणतीशी शहानिशा न करता शाळेतील शिक्षकांनी एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण करत लाथा मारल्याचा आरोप आहे. माझी चुक नाही अशी विद्यार्थ्याने वारंवार विनवणी करुनही शिक्षक त्याला सतत लाथा मारत राहिला.
हे ही वाचा : पुण्यात लोकल आणि डेक्कन एक्स्प्रेसला ब्रेक, मुंबईत काय परिस्थितीत?
याच वेळी एका विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलवर घटनेचे चित्रिकरण केले होते. ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिक्षकाच्या विरोधात रोष निर्माण झाला होता. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यालय प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तत्काळ बैठक बोलावली होती यात निर्णय झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune crime news