पुणे, 24 जून: पुण्यातील (Pune) आंबिलओढा (Ambil Odha slum) परिसरातील अतिक्रमण असणारी घरं हटवण्यासाठी आज पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह पोकलनही आणण्यात आला होता. यावेळी रहिवाशांना घरातून बाहेर काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यावेळी पोलीस आणि रहिवाशांमध्ये एकच झटापट झाली. तसंच, वृद्धांपासून ते लहान मुलांनी आपल्या भावनांना वाट करून देत ढसाढसा रडले.
आमची सर्व माणसं पोलीस स्टेशनमध्ये अडकली आहे. त्यांना तिथे मारत आहे. आम्हाला पोलीस इथं मारत होते. आमची घरं पाडली. कोण बिल्डर म्हणालं हे सात वर्षांपासून असचं आहे. मग आम्ही आता कुठे जायचं? असं म्हणत एक चिमुरड्या ढसाढसा रडला.
दरम्यान, आंबिल ओढा अतिक्रमण कारवाई प्रकरणी 130 कुटुंबांना कारवाई करून हटवण्यात आले आणि त्यानंतर तिथे महापालिकेच्या वतीने घर तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कारवाई करून बाहेर काढलेल्या 130 कुटुंबांपैकी 81 कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था राजेंद्रनगरच्या एस आर ए कॉलनीमधील इमारतीमध्ये करण्यात आली आहे.
AC मध्ये 1 ते 5 स्टार रेटिंग काय असतं? एसी घेताना समजून घ्या हे गणित, होईल फायदा
सुमारे 81 कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपाचा करारनामा तातडीने बांधकाम व्यावसायिकांकडून करून देण्यात येतोय. उर्वरित सुमारे पन्नास कुटुंबांनी बांधकाम व्यावसायिकाकडून भाडं घेऊन आपल्या पसंतीने जागा शोधून राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळी ज्या कारवाईने मोठा आक्रोश तयार झालेला होता दुपारपर्यंत प्रशासनाने अत्यंत वेगवान हालचाली करून परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं आणि कारवाई जवळपास पूर्ण केली.
Delta plus असो की दुसरा व्हेरिएंट; कोरोनाच्या प्रत्येक रूपापासून बचावाचा उपाय
आता यानंतर आंबील ओढा सरळ करण्याचे काम आणि एसआरएच्या इमारतीच्या बांधकामाला ही सुरुवात केली जाईल. इथे या इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या 130 कुटुंबीयांना तिथे घर देण्यात येतील.
आंबिलओढ्यावर काय आहे अतिक्रमणाचा वाद?
- 77 हून अधिक इमारतींना नोटीसा
- धनकवडी परिसरात सर्वाधिक अतिक्रमणे
- अनेक ठिकाणी नाल्याची रुंदी 18 मीटर
- बांधकामे 1987च्या विकास आराखड्यानुसार
- ओढ्याच्या आधी मांगडेवाडीत अतिक्रमण
- ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट
- नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा प्रशासनाचा घाट
- ऐन पावसाळ्यात जागा खाली करण्याचं काम
- एसआरए स्किमसाठी जागा खाली करण्याचं काम
- गेल्यावर्षी पुरामुळे झालं होतं नुकसान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune municipal corporation, Pune news, Pune police, पुणे