नवी दिल्ली, 24 जून: जेव्हा लोक एसी (AC) खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्या मनात रेटिंगच्या (Rating) अनुषंगाने अनेक प्रश्न असतात. स्टार रेटिंग किती असलेला एसी खरेदी करावा, वीज बचतीसाठी (Power Saver) पूरक AC कोणता असे प्रश्न लोकांच्या मनात असतात. यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो जाणून घेतला तर तुम्हाला एसी खरेदीचा निर्णय घेणं सोपं होईल. जाणून घेऊया हा फॉर्म्युला कसा आहे...
लोक बाजारात AC खरेदी करण्यासाठी जेव्हा जातात, तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. किती स्टार रेटिंग (Star Rating) असलेला एसी खरेदी करावा या त्यापैकी एक महत्वाचा प्रश्न. 1 स्टार असलेला एसी 2 स्टार असलेल्या एसीच्या तुलनेत अधिक वीज वापरतो, तर 5 स्टार असलेला एसी सर्वात कमी वीज वापरतो असं अनेकांचं म्हणणं असतं. या पार्श्वभूमीवर हे स्टार रेटिंग कसे काढले जातात, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. हे रेटिंग एनर्जी एफिशियन्सीवर (Energy Efficiency) अवलंबून असतात. एसीतील कुलिंग आऊटपूट (Cooling Output) आणि पॉवर इनपूटवर (Power Input) हे रेटिंग ठरवलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर 1 टन एसी प्रतितास 3516 वॅट वीज वापरतो.
ऊर्जा कार्यक्षमतेनुसार निश्चित होते रेटिंग -
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक एसीवर एनर्जी एफिशियन्सी रेश्यो (Energy Efficiency Ratio - EER) लिहिलेला असतो. जर एखाद्या एसीवर 2.7 ते 2.9 EER लिहीलं असेल, तर तो 1 स्टार रेटिंग असलेला एसी असतो.
2.9 ते 3.09 असेल तर 2 स्टार,
3.1 ते 3.29 असेल तर 3 स्टार,
3.3. ते 3.49 असेल तर 4 स्टार
आणि 3.5 पेक्षा अधिक असेल तर तो 5 स्टार रेटिंग असलेला एसी असतो.
एनर्जी एफिशियन्सी रेश्यो म्हणजेच ऊर्जा कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी कुलिंग आऊटपुट आणि एनर्जी इनपुट यांचं गणित करणं आवश्यक असतं. एसी खरेदी करताना हे गणित (Calculation) करता येतं. अर्थात तसा उल्लेख एसीवर केलेला असतो. त्यामुळे कुलिंग आऊटपुट आणि एनर्जी इनपुट यांचा भागाकार केल्यास एसी रेटिंगची आकडेवारी स्पष्ट होऊ शकते.
असं जाणून घ्या एसीचं रेटिंग -
सर्व एसी 1 टनाचे असतात आणि त्यांचं कुलिंग आऊटपूट 3516 वॅट असतं. या आऊटपूट आणि इनपूटचा भागाकार केल्यास रेटिंगचा आकडा मिळतो. जर एखादा एसी 1250 वॅट इनपूट वीज वापरत असेल, तर 3516 आणि 1250 चा भागाकार केल्यास रिझल्ट 2.00 येतो. EER Table पाहिल्यास 2.00 असलेला एसी 1 स्टार रेटिंगचा असेल. जर इनपुट पॉवर 11750 वॅट असेल आणि त्याला 3516 ने भागले तर 2.99 असा आकडा दिसेल. टेबलमध्ये 2.9 ते 3.09 रेटिंग हे 2 स्टार एसींसाठी असतं. त्यामुळे हा एसी 2 स्टार असेल. अशा पध्दतीने सर्व स्टार रेटिंग काढता येऊ शकतं.
जो एसी इनपुट म्हणून कमी वीज वापरतो, त्या तुलनेत त्याची स्टार रेटिंग अधिक असते. इनपुट पॉवरमुळे विजेचा वापर वाढतो. त्यामुळे जास्त रेटिंग असलेला एसी वीज बचत करणारा ठरतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news