देशात आता डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट अर्थात उत्परिवर्तन अवस्थेत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
2/ 8
देशात एकूण डेल्टा प्लस कोरोनाचे एकूण 40 रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
3/ 8
महाराष्ट्रात सर्वाधिक 21 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये रत्नागिरीत सर्वात जास्त 9 रुग्ण आहेत. तर जळगावमध्ये 7 आणि मुंबईत 2 रुग्ण आहेत. त्यानंतर पालघर, सिंधुदुर्ग, ठाण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आहे.
4/ 8
महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश 6, केरळ आणि तामिळनाडूत प्रत्येकी 3 तर पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांत प्रत्येकी एक रुग्ण सापडलेत.
5/ 8
मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उज्जैनमधील महिलेचा डेल्टा प्लस कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
6/ 8
डेल्टा प्लस व्हेरिएंटचं संक्रमण वाढत असताना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंटपासून बचावाचा उपाय सांगितला आहे.
7/ 8
कोरोनाचा कोणताही व्हेरिएंट असो त्याच्याशी लढण्यासाठी फक्त तीन शस्त्रं आहेत ते म्हणजे लॉकडाऊन, लसीकरण आणि कोरोना नियमांचं पालन.
8/ 8
कोरोनाचा कोणताही व्हेरिएंट असूदे या तिन मार्गांचं नीट अवलंब केला तस संक्रमणावर नियंत्रण राहू शकतं. त्यामुळे आपण आपले शस्त्र खाली ठेवू नका, असा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.