पुणे, 18 मे : भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला जोरदार धडक (Speeding bike hits senior citizen) दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीच्या धडकेमुळे वयोवृद्ध दूरवर फेकले गेले. या अपघातात वयोवृद्धाचा मृत्यू (senior citizen died in accident) झाला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगाव रस्त्यावर क-हावागज येथे ही घटना घडली आहे.
भरधाव वेगाने जाणाऱ्या यामाहा मोटरसायकलने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहन लष्करे असं या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. लष्कर बारामती मोरगाव रस्ता (Baramati Morgaon Road) ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या यामाहा मोटरसायकलने त्यांना धडक दिली.
रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक pic.twitter.com/QeGNEKotiF
— News18Lokmat (@News18lokmat) May 18, 2022
अपघातानंतर जवळपास तीस फुटापर्यंत लष्कर उडून पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये (Accident caught in CCTV) झाला आहे. यामाहा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मथुरेत भाविकांनी भरलेली बस ट्रकला धडकली
यमुना एक्सप्रेस वेवर एक मोठा अपघात झाला आहे. ज्यात भाविकांनी भरलेली बस ट्रकला धडकली. या अपघातात आतापर्यंत तीन भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. भाविकांनी भरलेली ही बस मथुरेहून दिल्लीला परतत असताना हा अपघात झाला.
वाचा : मिरा भाईंदर महानगरपालिकेत जोरदार राडा, नगरसेविका आपसात भिडल्या
या अपघातात आतापर्यंत 24 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या घटनेचे कारण समजू शकले नसले तरी जास्त वेग हे कारण असल्याचे मानले जात आहे.
मंगळवारी रात्री उशिरा मथुरेच्या नौझील पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेस वेवर मोठा अपघात झाला. भाविकांनी भरलेली बस एक्स्प्रेस वेवर पुढे जात असलेल्या ओव्हरलोड गिट्टीने भरलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे 40 भाविक जखमी झाले. माहिती मिळताच दाखल झालेले नौझिल पोलीस आणि एक्स्प्रेस वेच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना सीएचसी नौझिल येथे नेले. तेथून सहाहून अधिक जणांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.