Home /News /maharashtra /

VIDEO: मिरा भाईंदर महानगरपालिकेत जोरदार राडा, नगरसेविका आपसात भिडल्या

VIDEO: मिरा भाईंदर महानगरपालिकेत जोरदार राडा, नगरसेविका आपसात भिडल्या

VIDEO: मिरा भाईंदर महानगरपालिकेत जोरदार राडा, नगरसेविका आपसात भिडल्या

VIDEO: मिरा भाईंदर महानगरपालिकेत जोरदार राडा, नगरसेविका आपसात भिडल्या

मिरा भाईंदर महानगरपालिकेत जोरदार राडा झाला आहे. दोन नगरसेविका आपसात भिडल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिरा भाईंदर, 18 मे : मिरा भाईंदर महानगरपालिकेची (Mira Bhayander Municipal Corporation) सर्वसाधारण महासभा सुरु असतानाच चक्क दोन नगरसेविका आपसात भिडल्याची (Clash between two women corporators) घटना घडली आहे.विशेष बाब म्हणजे या नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यामुळे उपस्थितीत सभागृह सदस्य आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्याची वेळ आली. मंगळवारी दुपारी मिरा भाईंदर महानगरपालिकेची सर्व साधारण महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मिरा रोड येथे आरक्षण क्रमांक 261 या जागेवर उद्यान आरक्षण असताना बारची निर्मिती होत असल्याचा विषय भाजप नगरसेविका निला सोन्स यांनी 'ज' चा प्रस्ताव ठेवून उपस्थितीत केला. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सभा यावर निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न पुढील महासभेत घेण्याचे आदेश आपण देत असल्याचे पिठासीन अधिकारी म्हणून बसलेले उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी सांगितले. यामुळे संपूर्ण महासभेतील वातावरण तापले होते. त्याच दरम्यान भाजप नगरसेविका तथा आमदार गीता जैन या पुढील विषय मांडण्याकरता उभ्या राहिल्या. त्यावेळी भाजप नगरसेविका हेतल परमार यांनी काही भाष्य केले. त्यावर गीता जैन यांनी देखील परमार यांना 'अपने औकात में रेह' असे प्रत्युत्तर दिले. यामुळे हेतल परमार या संतापून थेट गीता जैन यांच्या अंगावर धावून गेल्या. वाचा : राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, पाहा VIDEO मात्र यावेळी उपस्थितीत सभागृह सदस्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी मध्यसी केल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. मात्र या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे दोन्ही नगरसेविकेच्या कृत्याचा निषेध करण्यात येत आहे. पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजप-राष्ट्रवादीचा राडा भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात सोमवारी (16 मे 2022) जोरदार गोंधळ झाला. या कार्यकर्मात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांवर चक्क भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार, भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Maharashtra News

पुढील बातम्या