जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पिंपरीत 7 जणांनी केली तरुणाची कोयत्याने हत्या, भाजप पदाधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरीत 7 जणांनी केली तरुणाची कोयत्याने हत्या, भाजप पदाधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरीत 7 जणांनी केली तरुणाची कोयत्याने हत्या, भाजप पदाधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरीत वडापावच्या पैशांवरून सुरू झालेला वाद हत्येपर्यंत पोहोचला, सात जणांनी केली एकाची हत्या…

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 20 ऑगस्ट : पिंपरी चिंचवडमध्ये हत्येचा एक भयंकर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सात जणांनी मिळून केलेल्या एका तरुणाच्या खुणामुळे पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. या घटनेत शुभम नखाते नामक 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर शुभमच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भाजपच्या युवा पदाधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 5 आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी ज्ञानेश्वर पाटील, अजय वाकुडे , प्रवीण धुमाळ, अविनाश भंडारी, मोरेश्वर आस्टे यांचा समावेश आहे. या प्रकरणात ज्याच्यावर खुनाचा कट रचल्या गेल्याचा आरोप आहे तो भाजप युवा मोर्चाचा चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर आणि त्याचा साथीदार प्रेम वाघमारे हे दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कोरोनाने नात्यांचा अंत पाहिला, पनवेलमध्ये समोर आली काळजाचं पाणी करणारी घटना या घटनेतील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील आणि अजय भारत वाकुडे यांचा तापकीर चौक इथे वडापावचा गाडा असून मयत शुभम आणि त्यांच्यात पूर्वीचे वाद होते. यावरून शुभम हा आरोपी ज्ञानेश्वर आणि अजयला वडापावच्या गाडीवर येऊन नेहमी शिवीगाळ करायचा, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात पुन्हा वाद झाले होते. हे सर्व प्रकरण मिटवण्यासाठी राज तापकीर याने मयत शुभम ला फोन करून काल म्हणजे बुधवारी रात्री 9च्या सुमारास बोलावले होते असं फिर्यादीत म्हटलं आहे. Corona ला हरवण्यात मुंबईकरांना यश, पालिकेने दिली आनंदाची बातमी यावेळी शुभम हा दुचाकीवर तापकीर चौकातील धोंडिराज मंगल कार्यालयात आला. तेव्हा, आरोपीमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि यातील आरोपींनी शुभमवर कोयत्याने वार केले. शुभम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यावेळी आरोपींनी घटनस्थळावरून पळ काढला. हे दृश्य मयत शुभमच्या वडिलाने स्वतः बघितले आणि त्यानुसार तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. इंडिकाच्या धडकेमध्ये मित्रांची क्षणात संपली मैत्री, भीषण अपघातात दोघे जागीच ठार तक्रार दाखल होताच, काही तासातच मुख्य आरोपीसह पाच जणांना वाकड पोलिसांनी अटक केली तर अद्याप दोघेजण फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune , pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात