Home /News /maharashtra /

इंडिकाच्या धडकेमध्ये मित्रांची क्षणात संपली मैत्री, भीषण अपघातात दोघे जागीच ठार

इंडिकाच्या धडकेमध्ये मित्रांची क्षणात संपली मैत्री, भीषण अपघातात दोघे जागीच ठार

भंडारा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

    भंडारा, 20 ऑगस्ट : राज्यात दोन आठवड्यांपासून मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ते आणि महामार्ग निसरडे झाले आहेत. अशात वारंवार अपघाताच्या घटना समोर येत आहेत. असाच भीषण अपघात भंडाऱ्यामध्ये समोर आला आहे. भंडारा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडाराकडून दोन युवक आपल्या दुचाकीने तुमसर जात असताना विरुद्ध दिसेने येणाऱ्या इंडिका कारने खरबी गावाजवळ जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. रोशन बोरकर वय 22 वर्ष आणि दुर्गेश कांबळे वय 20 वर्ष अशी मृतांची नावं असून हे दोघे दोन्ही मोरगाव इथले रहिवासी आहेत. मनसेनं केलेला गंभीर आरोप किशोरी पेडणेकरांनी फेटाळला, दिलं चोख उत्तर दोन्ही मित्रांचा अशा अकाली जाण्यामुळे इतर मित्रांमध्ये शोककळा पसरली असून कुटुंबियांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला असून चारचाकी चालकसह गाडीला ताब्यात घेतलं आहे. रोशन आणि दुर्गेश या दोघांचाही मृतदेह पोलिसांना ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर अपघाताचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मोठी बातमी! मुंबईत क्वारंटाईनचे नियम बदलले; पालिकेने परिपत्रक काढून दिली माहिती खरंतर, रोज सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्ग निसरडे झाले आहेत. त्यामुळे गाडी हळू चालवा अशा वारंवार सूचना देण्यात आल्या असूनही वेगावर नियंत्रण ठेवण्यात येत नाही. त्यामुळे अशा अपघाताच्या घटना समोर येतात. त्यामुळे निरड्या रस्त्यांवर वाहनं हळू चालवा आणि वेगेवर नियंत्रण असू द्या अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या