Home /News /news /

कोरोनाने नात्यांचा अंत पाहिला, पनवेलमध्ये समोर आली काळजाचं पाणी करणारी घटना

कोरोनाने नात्यांचा अंत पाहिला, पनवेलमध्ये समोर आली काळजाचं पाणी करणारी घटना

पुण्यात 54 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 17 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात 54 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 17 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पनवेलमध्ये कोरोनामुळे पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पनवेल, 20 ऑगस्ट : कोरोनाच्या संकाटमुळे राज्यात कहर केला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले तर काहींनी कोरोनाच्या भीतीने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचललं. नवी मुंबईतून अशीच काळजाला घर करणारी एक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमध्ये कोरोनामुळे पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या 70 वर्षीय पित्याचा मृत्यू झाला. 40 वर्षीय मुलाला वडिलांच्या निधनाची बातमी कळताच त्याचाही हृदयविकारानं निधन झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे तुम्ही अंदाज लावू शकता की कशा प्रकारे कोरोनाची भीती लोकांच्या मनात आहे. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं आहे. त्याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. Corona ला हरवण्यात मुंबईकरांना यश, पालिकेने दिली आनंदाची बातमी मिळालेल्या माहितीनुसार, पिता-पुत्रावर एकाचवेळी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुरू उपचार होते. वडिलांचं कोरोनामुळे निधन झाल्याचं समजताच मुलाला याचा प्रचंड त्रास झाला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये दोघांचाही एकावेळी मृत्य झाला. पिता पुत्राच्या या दुर्दैवी मृत्यूमूळे पनवेल परिसरात शोककळा पसरली आहे. इंडिकाच्या धडकेमध्ये मित्रांची क्षणात संपली मैत्री, भीषण अपघातात दोघे जागीच ठार दरम्यान, नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आजपर्यंत सर्वात जास्त कोरोना रुग्ण आज आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 477 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांचा आकडा हा 22 हजार 275वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या आकडेवारीनुसार, नवी मुंबईत आज दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 525 वर पोहोचला आहे तर सध्या 3446 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Lockdown, Mumbai, Mumbai police

पुढील बातम्या