Corona ला हरवण्यात मुंबईकरांना यश, पालिकेने दिली आनंदाची बातमी

Corona ला हरवण्यात मुंबईकरांना यश, पालिकेने दिली आनंदाची बातमी

रूग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन सध्या 0.78% झाला आहे तर रूग्ण बरे होण्याची टक्केवारी 80% झाली आहे. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी नव्वदीवर आला असल्याची माहिती समोर आली आहे. रूग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन सध्या 0.78% झाला आहे तर रूग्ण बरे होण्याची टक्केवारी 80% झाली आहे. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

आज मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी नव्वदीवर पोहोचला असून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. रूग्ण वाढीचा सरासरी दरही आज 0.78% असा आणखी कमी झाला असून, हे यशही अतिशय महत्त्वाचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 24 पैकी तब्बल 9 विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 100 दिवसांच्यावर आहे.

तर

- 5 विभागात 90 दिवसांवर

- 4 विभागात 80 दिवसांवर

- 1 विभागात 70 दिवसांवर

- 4 विभागात 60 दिवसांवर

दरम्यान, 24 पैकी 19 विभागात हा सरासरी दर 1% पेक्षा कमी आहे. रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर विचार केला तर प्रत्येक महिन्याला मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.

इंडिकाच्या धडकेमध्ये मित्रांची क्षणात संपली मैत्री, भीषण अपघातात दोघे जागीच ठार

पाहुयात नेमकी आकडेवारी

- 22 मार्च 3 दिवस

- 15 एप्रिल 5 दिवस

- 12 मे 10 दिवस

- 2 जून 20 दिवस ( 3.64%)

- 16 जून 30 दिवस (2.43%)

- 24 जून 41 दिवस (1.72%)

- 10 जुलै 50 दिवस (1.39%)

- 22 जुलै 60 दिवस (1.14%)

- 28 जुलै 70 दिवस(0.97%)

- 3 ऑगस्ट 80 दिवस (0.87%)

- 19 ऑगस्ट 90 दिवस (0.78%)

सीमेवर चीनची प्रत्येक युक्ती होईल अपयशी! 7 लष्करी हवाई अड्ड्यांवर भारताची नजर

दरम्यान, रुग्ण वाढीचा दर जरी कमी झाला असला तरी राज्यात रोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत. अशात आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणे पालिकेने शक्य झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत बऱ्याच अंशी कोरोना बाधितांची संख्याही नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आलं आहे. त्यात पालिकेने कोरोना रुग्णांच्या क्वारंटाईन नियमावलीत मोठा बदल केला आहे.

मनसेनं केलेला गंभीर आरोप किशोरी पेडणेकरांनी फेटाळला, दिलं चोख उत्तर

आता पालिकेने क्वारंटाईनचे नियम बदलले असून 50 वर्षे व त्या पुढील वयाच्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरणात राहता येणार नाही. या रुग्णांना कोणतीही लक्षणं नसली मात्र त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर त्यांना ccc2 म्हणजेच कोविड केअर सेंटर मध्ये रहावं लागणार आहे. तसेच अशा रुग्णांच्या घरी आणि इमारत किंवा चाळीच्या कॉमन जागांवर पालिकेकडून sanitization करण्यात येणार आहे. 50 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींचा मृत्युदर अधिक असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. याआधी मात्र morbidity आणि सौम्य लक्षणे असलेल्या 60 वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तींना घरी राहता येत होतं. पालिकेने नवं परिपत्रक काढत होम islolationचे नियम बदलले आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 20, 2020, 8:10 PM IST

ताज्या बातम्या