मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune: बॉयफ्रेंडच्या भावाला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडचा खटाटोप, भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून तोतया महिला पोलिसाला अटक

Pune: बॉयफ्रेंडच्या भावाला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडचा खटाटोप, भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून तोतया महिला पोलिसाला अटक

बॉयफ्रेंडच्या भावाला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडचा खटाटोप, पिंपरीत तोतया महिला पोलिसाला अटक

बॉयफ्रेंडच्या भावाला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडचा खटाटोप, पिंपरीत तोतया महिला पोलिसाला अटक

Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवड शहरात प्रियकराच्या भावाला वाचवण्यासाठी चक्क तोतया पोलीस कर्मचारी बनलेल्या तरुणीला भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड, 11 मे : तोतया पोलीस बनलेल्या तरुणांना पोलिसांनी पकडून बेड्या ठोकल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण आता पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मध्ये चक्क एका तोतया महिला पोलिसाला अटक (Fake woman police arrest) करण्य्यात आली आहे. आपल्या प्रियकराच्या भावाला वाचवण्यासाठी ही तरुणी तोतया पोलीस कर्मचारी बनली असल्याचं समोर आलं आहे.

कविता प्रकाश दोडके असं तोतया महिला पोलीस बनलेल्या तरुणीचे नाव आहे. कविता दोडके हिचा प्रियकर प्रियकर संतोष पोटभरे याच्या भावा विरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस (Bhosari MIDC Police) ठाण्यात एका सामाजिक कार्यकर्ते यांचे कार्यालय तोडफोड प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस त्याचा शोध घेत आल्याची माहिती संतोष पोटभरे याला मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन संतोष पोटभरे याची प्रेयसी कविता दोडके ही तोतया महिला पोलीस कर्मचारी बनून पोलिसांना जाब विचारू लागली.

पोलीस ठाण्यात बाळू पोटभरे यांचा शोध का घेत आहात, तुम्हाला तो अधिकार कुणी दिला मी तुमची तक्रार वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे करणार आणि तुम्हाला बघून घेते अशी धमकी दिली. त्यामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तोतया पोलीस कर्मचारी कविता दोडके हिला आपले ओळखपत्र मागितले असता तिने उद्धट वर्तन केलं.

वाचा : एका कोंबड्याची हत्येनं पूर्ण शहराची झोप उडवली; आरोपी पोलीस अधिकारी निलंबित

त्यांनतर पोलिसांनी कविता दोडके कडे अधिक तपास केल असता. तिने मी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे असं सांगितलं. पोलिसांना तिच्या बोलायची आणि वागण्याची पद्धत समजताच त्यांनी तिची अधिक चौकशी केली असता ती तोतया पोलीस शिपाई असल्याची खात्री पटल्यावर तिला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली.

गुवाहाटीत महिला पोलीस अधिकाऱ्याने होणाऱ्या पतीला केली अटक

आसाम पोलिसांतील एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं सध्या सगळे कौतुक करत आहेत. कारण तिने आपलं कर्तव्य इतर सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ असल्याचं सिद्ध केलं आहे. होणाऱ्या पतीच्या कथित गुन्ह्यांबद्दल माहिती मिळताच महिला पोलीस अधिकाऱ्याने एफआयआर दाखल करून त्याला अटक केली.

नॉर्थ ईस्ट क्रॉनिकलनुसार, जुनमोनी राभा नागाव जिल्ह्यात सब-इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या होणाऱ्या पतीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. राभा आणि आरोपी राणा पोगाग यांची जानेवारी २०२१ मध्ये भेट झाली होती, जेव्हा त्या माजुली येथे तैनात होत्या. राभाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांनी आणि पोगागने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये साखरपुडा केला होता आणि यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्याचं ठरवलं होतं.

वाचा : विवाहित प्रेयसीने घरात घुसून केली ही मागणी, 2 मुलांचा बाप असलेल्या प्रियकराची तंतरली

जुनमोनी राभाला समजलं की राणा हा ऑईल इंडिया लिमिटेडचा पीआर असल्याचं नाटक करत आहे आणि त्याने अनेकांना नोकऱ्या देण्याचं आमिष देऊन फसवलं आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की पोगागच्या घरातून ओएनजीसीचे 11 बनावट सील आणि बनावट ओळखपत्रांसह अनेक बनावट कागदपत्रं जप्त केली आहेत. राभा म्हणाल्या, 'मी त्या तिघांचे आभार मानते, जे त्याच्याबद्दल माहिती घेऊन माझ्याकडे आले, यामुळे मला समजलं की तो किती मोठा धोकेबाज आहे आणि माझे डोळे उघडले'.

First published:

Tags: Crime, Pimpri chinchawad police, Pune