बेतिया, 8 मे : प्रेमप्रकरण, विवाहबाह्य संबंध, त्यातून घडणारे वादावादीचे प्रसंग अनेकांनी पाहिलेले किंवा किमान ऐकलेले तरी असतील. अशी प्रकरणं नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. असंच एक विचित्र प्रेमप्रकरण समोर आलं आहे. एका विवाहित महिलेचे एका विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध होते. मात्र, हे सर्व लग्नापर्यंत पोहोचल्यानंतर प्रियकराने तिला नकार दिला. यानंतर भडकलेल्या महिलेने प्रियकराच्या घरी तळ ठोकला. ही विवाहित महिला आणि तिचा प्रियकर यांची या महिलेच्या बहिणीच्या घरी ओळख झाली. यानंतर ते दोघे प्रेमात पडले. प्रियकराने प्रेमाचं आणि लग्नाचं आश्वासन देत आपल्याशी 6 महिने संबंध ठेवल्याचा आरोप या विवाहित प्रेयसीने केला आहे. याबद्दलची तक्रार तिने पोलिसात दिली असून प्रियकराने आपल्याला फसवल्याचं तिचं म्हणणं आहे. यानंतर प्रेयसीने थेट प्रियकराचं घर गाठलं आणि लग्नाचा आग्रह धरत चांगलाच राडा केला. हे प्रकरण बिहारमधील बेतिया येथील आहे. ही विवाहित महिला दोन मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि तिने लग्नासाठी त्याच्या घरात तळ ठोकला. यामुळे जोरदार ड्रामा झाला. ही घटना लॉरिया पोलीस स्टेशन परिसरातील आहे. लग्नाला नकार दिल्यानंतर प्रेयसीने प्रियकराच्या घरी तळ ठोकला असून तिचं आधीच लग्न झालेलं आहे. आता ही महिला प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट धरून बसली असून प्रियकराचे घर सोडण्यास तयार नाही. महिलेचं म्हणणं आहे की, ‘मी लॉरिया पोलिस ठाण्यात प्रियकराच्या विरोधात अर्ज केला आहे. तो माझ्याशी लग्न करेपर्यंत मी हे घर सोडणार नाही.’ हे वाचा - मैत्रीच्या नात्याला काळिमा, अधिकाऱ्याचा मित्राच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रेयसीने आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, प्रियकर आधीच विवाहित होता. दोघेही प्रेमात पडल्यानंतर प्रियकराने महिलेचा फोटो काढून तिला प्रेमाचं आश्वासन दिलं आणि तो केरळला गेला. यानंतर प्रियकराने आपल्या फोटोसोबत छेडछाड करून त्याच्याशी स्वतःचा फोटो जोडला आणि अश्लील फोटो तयार केला आणि तो आपल्या पतीला नेऊन दाखवला, असा आरोप विवाहित महिलेनं केला आहे. प्रियकराने तिच्या पतीला त्यांच्यातील प्रेमसंबंधांविषयी सांगितल्यामुळे पतीने आपल्याला घरातून हाकलून दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसंच, सुरुवातीला लग्नाचं आश्वासन देऊन आता तो टाळाटाळ करत असल्याचं तिनं म्हटलं आहे. हे वाचा - शाळेत न येता फुकटाचा पगार घेत होती मुख्याध्यापिका, 5000 रुपयांत एका मुलीला ठेवलं यानंतर रागाच्या भरात या विवाहित महिलेनं तिच्या प्रियकराचं घर गाठलं आणि तिथे तळ ठोकला. लग्न करण्याचं आश्वासन देऊन त्याने तिच्याशी संबंध ठेवले, असं तिचं म्हणणं आहे. महिलेचा प्रियकर विवाहित असून तो दोन मुलांचा बाप आहे, असं सांगितलं जात आहे. सहा वर्षांपूर्वीच त्याचं लग्न झालं असून आता त्याच्याविरोधात त्याच्या विवाहित प्रेयसीने पोलिसात तक्रार दिली आहे. हे प्रकरण संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.