मराठी बातम्या /बातम्या /देश /नात्यापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं! महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्याच होणाऱ्या पतीला केली अटक

नात्यापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं! महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्याच होणाऱ्या पतीला केली अटक

राभा आणि आरोपी राणा पोगाग यांची जानेवारी २०२१ मध्ये भेट झाली होती, जेव्हा त्या माजुली येथे तैनात होत्या. राभाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांनी आणि पोगागने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये साखरपुडा केला होता

गुवाहाटी 11 मे : आसाम पोलिसांतील एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं सध्या सगळे कौतुक करत आहेत. कारण तिने आपलं कर्तव्य इतर सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ असल्याचं सिद्ध केलं आहे. होणाऱ्या पतीच्या कथित गुन्ह्यांबद्दल माहिती मिळताच महिला पोलीस अधिकाऱ्याने एफआयआर दाखल करून त्याला अटक केली (Cop Arrests Fiancé on Fraud Charges).

नखात रक्ताचे अंश सापडले अन् रिमाचा मारेकरी सापडला, मुंबई पोलिसांनी अवघ्या 5 तासात उकलले गुढ

नॉर्थ ईस्ट क्रॉनिकलनुसार, जुनमोनी राभा नागाव जिल्ह्यात सब-इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या होणाऱ्या पतीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. राभा आणि आरोपी राणा पोगाग यांची जानेवारी २०२१ मध्ये भेट झाली होती, जेव्हा त्या माजुली येथे तैनात होत्या. राभाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांनी आणि पोगागने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये साखरपुडा केला होता आणि यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्याचं ठरवलं होतं.

जुनमोनी राभाला समजलं की राणा हा ऑईल इंडिया लिमिटेडचा पीआर असल्याचं नाटक करत आहे आणि त्याने अनेकांना नोकऱ्या देण्याचं आमिष देऊन फसवलं आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की पोगागच्या घरातून ओएनजीसीचे 11 बनावट सील आणि बनावट ओळखपत्रांसह अनेक बनावट कागदपत्रं जप्त केली आहेत. राभा म्हणाल्या, 'मी त्या तिघांचे आभार मानते, जे त्याच्याबद्दल माहिती घेऊन माझ्याकडे आले, यामुळे मला समजलं की तो किती मोठा धोकेबाज आहे आणि माझे डोळे उघडले'.

बंटी-बबली जोडीची करामत, 200 पेक्षा जास्त महिलांना 5 कोटींना फसवलं, पण अखेर....

या वर्षाच्या सुरुवातीला देखील बिहपुरियाचे आमदार अमिया कुमार भुयान यांच्यासोबतचं टेलिफोनिक संभाषण सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर राभा चर्चेत आल्या होत्या. आमदाराने त्यांना आसाममधील आपल्या मतदारसंघातील लोकांना त्रास देऊ नये असं सांगितं होतं. मात्र, त्यांनी असं करण्यास नकार देत सरकारने घालून दिलेले नियम मोडल्याबद्दल आमदारांनाच खडसावलं.

First published:
top videos

    Tags: Assam, Police