Home /News /crime /

एका कोंबड्याची हत्येनं पूर्ण शहराची झोप उडवली; आरोपी पोलीस अधिकारी निलंबित

एका कोंबड्याची हत्येनं पूर्ण शहराची झोप उडवली; आरोपी पोलीस अधिकारी निलंबित

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका छोट्या शहरात एका कोंबड्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे (Murder of Chicken by Police). कोंबड्याच्या हत्येने 18,000 लोकसंख्या असलेलं संपूर्ण शहर अस्वस्थ झालं आहे.

    नवी दिल्ली 09 मे : सध्या एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. यात मिसिसिपीमधील एका छोट्या शहरात एका कोंबड्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे (Murder of Chicken by Police). कोंबड्याच्या हत्येने 18,000 लोकसंख्या असलेलं संपूर्ण शहर अस्वस्थ झालं आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर कोंबड्याला मारल्याचा आरोप आहे. यानंतर लोकांनी बदला घेण्यासाठी महिला अधिकाऱ्याला शिक्षा देण्याची मागणी लावून धरली आहे. कोंबड्याचं नाव कार्ल होतं. तो रात्रंदिवस ओशन स्प्रिंग्सच्या रस्त्यावर फिरत असे. तो पहाटे लवकर स्थानिक लोकांच्या दुकानात पोहोचायचा. विवाहित प्रेयसीने घरात घुसून केली ही मागणी, 2 मुलांचा बाप असलेल्या प्रियकराची तंतरली हा कोंबडा खूप लोकप्रिय होता. तो कॉफी शॉपमध्ये जाऊन पाणी प्यायचा.इतकंच नाही तर तो फिटनेस क्लासलाही जात असे. तो इतका मनमिळाऊ होता की तो लोकांजवळ जाऊन फोटोसाठी पोज द्यायचा आणि शहरभरातील रेलिंगवर डुलकी घेताना दिसायचा. तो जिथे झोपायचा तिथे कार्नेशन्सचे हार घालण्यात यायचे. काही दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. एक प्रकारे त्याचं अपहरण झालं होतं. असा आरोप आहे, की महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याची हत्या केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप बेपत्ता आहे. यानंतर मुलांनी कार्लच्या स्मरणार्थ प्रेमपत्रं लिहिली आणि ती संपूर्ण शहराच्या खिडक्यांवर चिकटवली. स्थानिक कलाकाराने कोंबड्याच्या स्मरणार्थ एक भित्तिचित्रही रेखाटलं. कार्ल ज्या टॅटू आर्टिस्टच्या पार्लरमध्ये राहायचा त्याने वॉशिंग्टन पोस्टला सांगितलं की 25 एप्रिल रोजी जेव्हा तो त्याच्या दुकानात आला तेव्हा कार्ल कुठेही सापडला नाही. त्यानंतर अनेक दिवस तो घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू होता. 24 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजता एक महिला तीन पुरुषांसह तिथे आलेली आणि त्याला पकडून घेऊन गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झालं आहे. घरातील किरकोळ कारणावरुन वाद, नवविवाहितेने उचलले धक्कादायक पाऊल सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव केंद्र शेफर आहे आणि ती जोन्स काउंटी जुवेनाईल डिटेन्शन सेंटरमध्ये पोलीस अधिकारी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शॅफर कार्लचा मृतदेह 15 मिनिटांनंतर पार्किंगमध्ये टाकताना दिसली. कार्लच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यानंतर शॅफरला पोलिसांनी प्राण्यांसोबतच्या क्रूरतेबद्दल नोटीस बजावली होती आणि तिला नोकरीवरूनही काढण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं की कार्लच्या मृत्यूनंतर जवळपास एका तासाने एका व्यक्तीने त्याच्या शरीराचे तुकडे एका पिशवीत भरून नेले. नंतर त्याचं मृत शरीरही गायब होतं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Chicken, Murder

    पुढील बातम्या