मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

VIDEO : पिंपरी चिंचवडमध्ये जीर्ण घराचं छत कोसळलं; 2 तास ढिगाऱ्याखाली अडकलेली मुलगी पण...

VIDEO : पिंपरी चिंचवडमध्ये जीर्ण घराचं छत कोसळलं; 2 तास ढिगाऱ्याखाली अडकलेली मुलगी पण...

पिंपरी चिंचवडमध्ये जीर्ण झालेल्या घराचं छत कोसळलं (Building Collapsed in Pimpri Chinchwad). याच ढिगाऱ्याखाली एक मुलगी अडकली होती. तिला वाचवण्यासाठी बराच वेळ प्रयत्न करण्यात आला.

पुणे 28 ऑगस्ट : पुण्याच्या (Pune) पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एक मोठी दुर्घटना घडली. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये जीर्ण झालेल्या घराचं छत कोसळलं (Building Collapsed in Pimpri Chinchwad). याच ढिगाऱ्याखाली एक मुलगी अडकली होती. तिला वाचवण्यासाठी बराच वेळ प्रयत्न करण्यात आला. अखेर अथक प्रयत्नांनंतर 2 तासांनी या मुलीची सुखरूप सुटका केली गेली आहे. ही घटना पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी येथील आहे.

पुण्यात संरक्षण भिंत कोसळून एकाचा मृत्यू;बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे घडला प्रकार

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation), अग्निशामक दलाचे कर्माचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. दोन तास या मुलीला ढिगाऱ्याखालून काढण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. अखेर दोन तासांनी यश आलं आणि हे बचावकार्य पूर्ण झालं. या मुलीला PCMC च्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलं आहे.

एक वडापाव पडला 8 लाखांना; रक्षाबंधनाच्या दिवशीच पुण्यातील महिलेसोबत विचित्र घटना

घटनास्थळी आसपासच्या नागरिकांनी गर्दी केली होती. बचावकार्यानंतर या नागरिकांनी बचावपथकाचं टाळ्या वाजवून कौतुक केलं. या घटनेचा व्हिडिओ (Video) समोर आला आहे.

तू गट्ट्या आव्हाळेला नडतो काय? विचारत तरुणावर कोयत्यानं केले वार; पुण्यातील घटना

वेळीच बचावकार्य राबवलं गेल्यानं या मुलीचा जीव वाचवता आला आहे आणि मोठा अनर्थ टळला आहे.

First published:

Tags: Pune, Video clip