• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुण्यात सोसायटीतील संरक्षण भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे राजेशने गमावला जीव

पुण्यात सोसायटीतील संरक्षण भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे राजेशने गमावला जीव

या घटनेत राजेश यांचा मृत्यू झाला असून आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे.

  • Share this:
पुणे, 27 ऑगस्ट : सोसायटीच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली भिंत कोसळून एकजण जागीच ठार झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीय. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेत राजेश गायकवाड या व्यक्तीचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाल्याची माहितीही समोर येत आहे. पिंपरीतील भैरव नगरमधील साई कम्फर्ट सोसायटीची भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडलीय. या सोसायटी च्या बाजूने ड्रेनेज लाईन खोदण्याचे काम सुरू होते, त्यासाठी भिंतीच्या बाजूला खड्डा खोदण्यात आला होता. त्यामुळे संरक्षक भिंतीखालील माती खचली होती. संध्याकाळच्या सुमारास भिंतीच्या शेजारी उभ्या असलेल्या राजेश यांच्या अंगावर भिंत कोसळली. त्यात त्यांना जीव गमवावा लागला. (One killed as wall of society collapses in Pune Rajesh lost his life due to negligence of the builder ) या आधीही ही भिंत दोन वेळा कोसळली होती. या घटनांनंतर स्थानिक नागरिकांनी संबधित बिल्डरला भिंतीचे मजबुतीकरणं करण्याची विनंतीही केली होती, मात्र त्याकडे संबंधित बिल्डरने दुर्लक्ष केले होते. तडे गेलेली ही भिंत आज कोसळली, त्याला बिल्डरच जबाबदार घडल्याच प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेला संबंधित बिल्डर आणि ड्रेनेज लाईनच खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी मयत गायकवाड यांच्या कुटुंबीय आणि नागरिकांनी केली आहे. हे ही वाचा-पुणे हादरलं! नशेचं इंजेक्शन देत रॅपरकडून अल्पवयीन मॉडेलवर बलात्कार दुघटनेत मृत पावलेले राजेश गायकवाड हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे कर्मचारी होते, अशीही माहिती मिळालीये.  नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं धोकादायक बांधकाम करणाऱ्या आणि भिंतीला तडे गेलेले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्ड वर महापालिका आयुक्त राजेश पाटील काय कारवाई करतात, याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे. पिंपची चिंचवड महपालिकेसह राज्यात प्रमुख शहरांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. याला जबाबदार असलेल्या बिल्डरांवर आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येते का, हा खरा प्रश्न आहे. अनधिकृत इमारतींचा विळखा, निकृष्ट दर्जाचे बांधकाम यामुळे यापूर्वीही अनेकांचा बळी गेला आहे. मात्र याबाबत कोणताही कठोर कायदा राज्यात अस्तित्वात नाही.
Published by:Meenal Gangurde
First published: