मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

'तू गट्ट्या आव्हाळेला नडतो काय?' विचारत तरुणावर कोयत्यानं सपासप वार; पुण्यातील थरारक घटना

'तू गट्ट्या आव्हाळेला नडतो काय?' विचारत तरुणावर कोयत्यानं सपासप वार; पुण्यातील थरारक घटना

पुण्यात एका तरुणावर धारदार कोयत्यानं सपासप वार केले आहेत. (फोटो-Livesupdates)

पुण्यात एका तरुणावर धारदार कोयत्यानं सपासप वार केले आहेत. (फोटो-Livesupdates)

Crime in Pune: पुण्यातील एका हॉटेलसमोर आपल्या मित्रासोबत गप्पा मारत असताना, अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणावर धारदार कोयत्यानं वार (Attack with Scythe) केले आहेत.

    पुणे, 27 ऑगस्ट: पुण्यात (Pune) एका तरुणावर धारदार कोयत्यानं सपासप वार (Attack with Scythe) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलसमोर आपल्या मित्रासोबत गप्पा मारत असताना, अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणावर धारदार कोयत्यानं वार केले आहेत. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी (Young man injured in attack) झाला आहे. हा हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या एका तासात दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या (2 Accused arrested) आहेत. याप्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, शैलेश उत्तरेश्वर बिडवे (वय 35) आणि किशोर चंद्रकांत व्हडले ऊर्फ आचारी (वय 27) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर अक्षय अनिल कवडे असं जखमी झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. जखमी अक्षय हा वाघोलीतील कवडे वस्ती येथील रहिवासी आहे. फिर्यादी अक्षय हा 24 ऑगस्ट रोजी आपला मित्र गणेश याच्यासोबत एका हॉटेलजवळ गप्पा मारत बसला होता. हेही वाचा-पुणे हादरलं! नशेचं इंजेक्शन देत रॅपरकडून अल्पवयीन मॉडेलवर बलात्कार दरम्यान दोन तरुण दुचाकीवरून त्याठिकाणी आले. त्यांच्याकडे धारदार कोयता होता. याठिकाणी येताच आरोपींनी ‘तु गट्टया आव्हाळेला नडतोस काय? तुला खल्लासच करून टाकतो’ असं म्हणत अक्षयला शिवीगाळ करायला सुरुवात केली. यानंतर आरोपीनं अक्षयवर कोयत्यानं वार केले. यावेळी गट्टया आव्हाळेचा मित्र शैलेश बिडवे यानंही अक्षयवर वार करत त्याला गंभीर जखमी केलं. ‘अक्षयला वाचवायला कोण येतं तेच बघू’ असं म्हणत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. हेही वाचा-मुंबई हादरली! घरगुती उपचाराच्या नावाखाली 2महिने अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपींना एका तासाच्या आत अटक केली आहे. संबंधित आरोपी वाघोली येथे थांबले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या