मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

शरद पवारांच्या गाडीचं स्टिअरिंग आणखी एका नातवाच्या हाती... पाहा VIDEO

शरद पवारांच्या गाडीचं स्टिअरिंग आणखी एका नातवाच्या हाती... पाहा VIDEO

शरद पवार आपल्या नातवाला 'राजकीय स्टिअरिंग' हाती धरण्याचे ट्रेनिंग देणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवार आपल्या नातवाला 'राजकीय स्टिअरिंग' हाती धरण्याचे ट्रेनिंग देणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवार आपल्या नातवाला 'राजकीय स्टिअरिंग' हाती धरण्याचे ट्रेनिंग देणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    बारामती, 6 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याच्या गाडीचं स्टिअरिंग त्यांच्या आणखी एका नातवाच्या हातात गेलं आहे. खासदार सुप्रीया सुळे यांचे चिरंजिव विजय सदानंद सुळे याया ड्रायव्हिंग परवाना मिळाला. नंतर विजय यानं थेट आजोबा शरद पवार यांना गाडीतून फेरफटका मारला. सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात एक व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला. आहे. शरद पवार शेजारच्या सीटवर बसून आपल्या नातवाला ड्रायव्हिंगचे धडे देत आहेत. त्यामुळे शरद पवार आपल्या नातवाला 'राजकीय स्टिअरिंग' हाती धरण्याचे ट्रेनिंग देणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हेही वाचा...इलेक्ट्रिक DPचा स्फोट, उडालेल्या उष्ण ऑईलनं होरपळून 4 महिन्यांच्या नातीसह आजीचा मृत्यू खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना कन्या रेवती, पुत्र विजय ही दोन मुलं आहेत. त्यामुळे पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याप्रमाणे शरद पवार हे रेवती आणि विजय यांनाही राजकीय आखाड्यात उतरवणार का? अशीही चर्चा सुरू झाली आहे. झालं असं की, विजय याला ड्रायव्हिंगचा नुकताच परवाना मिळाली. विजय यानं थेट आजोबा शरद पवार यांना गाडीतून फेरफटका मारला. यावेळी मागील सीटवर खुद्द सुप्रिया सुळे बसल्या होत्या. आजोबा शरद पवार आपल्या नातवाला ड्राईव्हिंगचे धडे देताना पाहून आई सुप्रिया सुळेंनी फेसबूक लाईव्ह केलं. हेही वाचा...'सरकार' नावाची व्यवस्था आहे कुठे? केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सुरू, विखेंचा हल्लाबोल 'आपली मुलं जेव्हा मोठी होतात, गाडी चालवायला शिकतात, तेव्हा वेगळा आनंद पालक म्हणून होतो, आज विजय सुळे, ज्यांना लायसन्स मिळाले आहे- लर्निंग आणि फायनल, तो त्याच्या आजोबांना ड्राईव्हला घेऊन चालला आहे. सगळ्यांना छोट्या वाटत असल्या तरी आईसाठी मोठ्या गोष्टी असतात. 'इट्स अ स्पेशल मुमेंट फॉर अस' असं सुप्रिया सुळे यांनी दीड मिनिटांच्या फेसबुक लाईव्हमध्ये अखेरीस म्हटलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Sharad pawar, Supriya sule

    पुढील बातम्या