• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'सरकार' नावाची व्यवस्था आहे कुठे? केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सुरू, विखे पाटलांचा हल्लाबोल

'सरकार' नावाची व्यवस्था आहे कुठे? केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सुरू, विखे पाटलांचा हल्लाबोल

अहमदनगर जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. प्रत्येक मंत्री आहेत संस्थानिक आहे. मात्र, जनतेसाठी काहीही करण्याची त्यांची भूमिकाच नाही

  • Share this:
शिर्डी, 6 सप्टेंबर: भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. राज्यात 'सरकार' नावाची व्यवस्था कुठे आहे. केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सुरू असल्याचा घणाघाती आरोप विखे पाटील यांनी केला आहे. हेही वाचा.....तर 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत लोकल, शाळा, कार्यालये सुरू होणार; TIFR चा अहवाल राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, सरकार काय करत आहे, हे त्यांनी माहीत नाही आहे. केवळ मोठमोठाले दावे केले जात आहेत. कोरोनासाठी मोठे हॉस्पिटल उभारल्याचे केवळ दावे उद्धव ठाकरे सरकारनं केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. प्रत्येक मंत्री आहेत संस्थानिक आहे. मात्र, जनतेसाठी काहीही करण्याची त्यांची भूमिकाच नाही, अशा शब्दांत विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्य मंत्री प्राजक्त तनपुरेंसह राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ...तर कोर्टात जाणार- विखे पाटील शिर्डीतील साईबाबा मंदिर अद्याप बंद आहे. शहरातील सर्व आर्थिक व्यवहार मंहिरावर अवलंबून आहेत. शिर्डी संस्थान कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा विखे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. संस्थानच्या निर्णयाविरोधात कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. लाक्षणिक उपोषणाचा विखेंचा इशारा... अनेक वर्षांपासून शिर्डी संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलं जावं. पगार कपातीचा निर्णय मागे घ्यावा, ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. अनेकदा मागणी करूनही संस्थानच्या अध्यक्षांचे दुर्लक्ष केलं. संस्थानच्या अध्यक्षांना काम करायला वेळ नसेल तर पदावरून दूर व्हा, असं म्हणत विखे पाटील यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. हेही वाचा... पुण्यातील कोरोना परिस्थितीबद्दल खुद्द अजित पवारांनी केला मोठा खुलासा सध्या जिल्हा न्यायाधिश संस्थानचा कारभार बघत आहेत. अध्यक्षांनी मागण्या मान्य न केल्यास जिल्हा न्यायालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: