जुन्ररमधून राष्ट्रवादीला दु:खद धक्का, कोरोनामुळे ज्येष्ठ नेत्याचे निधन

जुन्ररमधून राष्ट्रवादीला दु:खद धक्का, कोरोनामुळे ज्येष्ठ नेत्याचे निधन

जुन्नरमध्ये गरजू लोकांना मदत करण्यासाठी लॉकडाउनच्या काळात त्यांनी काम केले होते.

  • Share this:

जुन्नर, 19 जुलै :  पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (वय 58) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची  प्राणज्योत मालवली.

जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांचा कोरोनामुळे  पहाटे पुणे येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले आहे. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

24 तासांत 38 हजार 903 रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांची चिंताजनक आकडेवारी

काही दिवसांपूर्वी दिनेश दुबे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.

माजी आमदार वल्लभ बेनके, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिनेश दुबे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक लढवय्या नेता कोरोनाच्या लढाईत अपयशी झाल्याची हळहळ जुन्नरमध्ये व्यक्त होत आहे.

नगरसेवक दिनेश दुबे हे राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते होते. जुन्नरमध्ये अनेक कामात त्यांचा सहभाग होता. मागील महिन्यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दिनेश दुबे  आंदोलनात सहभागी झाले होते.  जुन्नरमध्ये गरजू लोकांना मदत करण्यासाठी लॉकडाउनच्या काळात त्यांनी काम केले होते.

दिनेश दुबे यांनी नगरपरिषदेचे अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

राज्यात याआधीत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण

राजकीय नेत्यांमध्ये राज्यात सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांच्या उपचारानंतर जितेंद्र आव्हाड या संकटातून सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

लॉकडाउन का लावला? कलेक्टर, कमिश्नर हाजीर हो; कोर्टाचे आदेश

अशोक चव्हाण हे उपचारासाठी नांदेडहून मुंबईत दाखल झाले. यशस्वी उपचारानंतर तेही पुन्हा सुखरूप घरी परतले. त्यानंतर कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्या धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची बाधा झाली. सुदैवाने मुंबईतील एका रुग्णालयातील 11 दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडे यांनीही कोरोनावर मात केली. त्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पुण्यात नगरसेवक, खासदार, आमदारांनीही कोरोनाची लागण झाली.

Published by: sachin Salve
First published: July 19, 2020, 11:27 AM IST
Tags: junnerNCP

ताज्या बातम्या