Home /News /news /

लॉकडाउन का लावला? कलेक्टर, कमिश्नर हाजीर हो; कोर्टाचे आदेश

लॉकडाउन का लावला? कलेक्टर, कमिश्नर हाजीर हो; कोर्टाचे आदेश

सोलापुरात 16 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

सोलापूर, 19 जुलै : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापुरात दहा दिवसांचा लॉकडाउन घेण्यात आला. मात्र, आता याविरोधातील याचिकेच्या सुनावणीसाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी या तिनही अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्हा कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती दावेदार नितीन चव्हाण यांनी दिली. सोलापुरात 16 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याविरोधात शंभुराजे युवा संघटनेचे प्रमुख नितीन चव्हाण, सचिव अभिजीत पवार यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला होता. मंदिरांसाठीही पॅकेज द्या, चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र या खटल्याच्या सुनावणीदरम्यान शनिवारी न्यायाधिशांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. मागील साडेतीन महिन्याच्या कालावधीत केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना रोजगार नाही, तसंच लॉकडाउन करण्यासाठी जिल्ह्याचे चीफ मेडीकल ऑफिसरची परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र, प्रशासनाने यांची परवानगी घेतली नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी दाखल केला होता. पंक्चर काढण्यासाठी उभ्या ट्रकमुळे 3 वाहनांचा विचित्र अपघात, पाहा हा VIDEO त्यामुळे या सुनावणीसाठी या तिनही अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे मंगळवार 21 जुलै रोजी न्यायाधीश काय सुनावणी देतात याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले Eus. या मध्ये याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. संतोष होसमनी यांनी काम पाहिले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Solapur, सोलापूर

पुढील बातम्या