नवी दिल्ली, 19 जुलै : देशातील कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांनी आज सर्व रेकॉर्ड मोडले. देशात पहिल्यांदाच 24 तासांत तब्बल 38 हजार 903 नवे रुग्ण सापडले. यासह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 10 लाख 77 हजार 618 झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 543 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात 3 लाख 73 हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 26 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर, 6 लाख 77 हजार 422 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 10.86 टक्के आहे. तर, रिकव्हरी रेट हा 65.24% झाला आहे. देशातील सर्वात कोरोना प्रभावित राज्य आहे महाराष्ट्र (Maharashtra).
Highest single day spike of 38,902 cases and 543 deaths reported in India in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 19, 2020
Total #COVID19 positive cases stand at 10,77,618 including 3,73,379 active cases, 6,77,423 cured/discharged/migrated and 26,816 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/u8im5qLQcI
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख पार महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही ब्रिटन देशातील एकूण रुग्णांपेक्षा जास्त आहे.जर महाराष्ट्र हा देश असता, जर जगातील एकूण कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत 10वा क्रमांक असता. राज्यात शनिवारी 8 हजार 348 नवे कोरोना रुग्ण सापडले. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 144 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांचा आकडा हा 11हजार 569वर पोहचला आहे. तर, राज्यात 3 लाख 937 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 1 लाख 65 हजार 663 रुग्ण निरोगी झाले आहे. (हे वाचा- शास्त्रज्ञांना आढळलं कोरोनाव्हायरसचं नवं रुप, हरवण्याचा केवळ एकच उपाय ) जगात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार सलग दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली. शनिवारी 24 तासांत 2 लाख 59 हजार 848 रुग्णांची नोंद झाली. तर, शनिवारी अमेरिका, ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधून सर्वात जास्त रुग्णांनी नोंद झाली. याआधी शुक्रवारी 2 लाख 37 हजार 743 नवीन रुग्ण सापडले होते. 10 मेनंतर एका दिवसात सर्वात जास्त कोरोना मृतांची नोंद झाली आहे. 17 जुलै रोजी कोरोनानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7,360 पोहचली आहे.

)







