मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अजित पवारांनी डिलीट केलं 'ते' ट्वीट; म्हणाले, कधी कधी वरिष्ठांचं पण ऐकावं लागतं

अजित पवारांनी डिलीट केलं 'ते' ट्वीट; म्हणाले, कधी कधी वरिष्ठांचं पण ऐकावं लागतं

अजित पवारांचा ट्वीट पाहून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, अजित पवार यांनी तासाभरातच हे ट्वीट डिलीट केलं.

अजित पवारांचा ट्वीट पाहून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, अजित पवार यांनी तासाभरातच हे ट्वीट डिलीट केलं.

अजित पवारांचा ट्वीट पाहून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, अजित पवार यांनी तासाभरातच हे ट्वीट डिलीट केलं.

पुणे, 25 सप्टेंबर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटे सहा वाजता पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहाणी केली. कामांची पाहाणी करताना मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करा, अशा सूचना देखील त्यांनी यंत्रणेला दिल्या. त्यानंतर अजित पवार यांनी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती जागवणारे ट्वीट केलं. मात्र, काही वेळातच अजित पवार यांनी संबंधित ट्वीट डिलीट केलं. यावरून राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.

 हेही वाचा...अजित दादा अॅक्शनमध्ये; पहाटे 6 वाजता पुणे मेट्रो पाहणीसाठी हजर

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त अजित पवार यांनी  त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, असं ट्वीट केलं होतं. अजित पवारांचा ट्वीट पाहून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, अजित पवार यांनी तासाभरातच हे ट्वीट डिलीट केलं. ट्वीट डिलीट केल्यानं आणखी जोरदार चर्चा रंगली. मात्र, आपण ट्वीट डिलीट का केलं याचं स्पष्टीकरण देखील अजित पवार यांनी दिलं आहे.

समाजकारण, राजकारण करत असताना कधी कधी वरिष्ठांचं पण ऐकावं लागतं, असं अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगलं बोलतो ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

सोशल मीडियात अशा उमटल्या प्रतिक्रिया...

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याकडून भारतीय जनसंघाच्या दिवंगत नेत्याला जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानं राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा तर सुरू झाली. अजित पवार यांचं भाजपवरील प्रेम कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. सोबत सोशल मीडियावर देशी प्रतिक्रिया उमटल्या.

हेही वाचा...‘देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात जायचं असेल’, संजय राऊतांनी साधला निशाणा

'दादा रॉक्स, जुन्या आठवणी ताज्या झाल्या, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. मात्र, त्यानंतर तासाभरातच अजित पवारांच्या ट्विटर हॅण्डलवरुन ते ट्वीट डिलीट करण्यात आलं.

मंदिर मशिदीबाबत टप्प्या टप्प्यानं निर्णय घेऊ...

मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्च उघडावे असं आम्हाला ही वाटतं. पण कोरोनाची बाधा होऊ नये. म्हणून सावधपणे टप्प्या टप्प्याने निर्णय घेऊ, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. पुण्यात गणेश उत्सवानंतर कोरोना परत वाढला. मात्र, जनता कर्फ्यूमुळे कोरोना रुग्ण कमी होत आहे. आगामी नवरात्र, दिवाळी, ख्रिसमस हे सण देखील साधेपणाने साजरे करावे लागणार, असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

First published:

Tags: Ajit pawar, Pune, Pune ajit pawar