Home /News /mumbai /

‘देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात जायचं असेल’, संजय राऊतांनी साधला निशाणा!

‘देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात जायचं असेल’, संजय राऊतांनी साधला निशाणा!

kunal kamra invites sanjay raut on his podcast

kunal kamra invites sanjay raut on his podcast

'सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकारणाचं काय झालं असा आमचा सवाल आहे, CBIला या प्रकरणात काहीही हाती लागलं नाही.'

    मुंबई 25 सप्टेंबर: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे सध्या राष्ट्रीय प्रश्न समजून घेत आहेत. बहुतेक ते राष्ट्रीय राजकारणात जातील असा टोला त्यांनी लगावला. फडणवीस यांना भाजपने बिहारचं निवडणूक प्रभारी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निशाणा साधला आहे. शिवसेना बिहारच्या निवडणुका लढवणार का याचा 1 ते दोन दिवसांमध्ये निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं. राऊत म्हणाले, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचं बिहार आणि केंद्र सरकारने राजकारण केलं आहे. बिहारच्या निवडणुका लक्षात घेऊन हे राजकारण सुरू आहे. सर्व प्रकार सुनियोजित असून ठरवून केलं जातेय असा आरोपही त्यांनी केला. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकारणाचं काय झालं असा आमचा सवाल आहे, CBIला या प्रकरणात काहीही हाती लागलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. NCBचे काम हे आंतरराष्ट्रीय सीमेवरून येणारे ड्रग्ज रोखण्यासाठी आहे. पण इथे एकेका व्यक्तीला बोलवलं जातं आहे. देशात फिल्म उद्योग वाढत असेल तर स्वागत आहे. इथला ऐषोराम सोडून कुणी जाणार नाहीत. इथून कुणी जाणार नाही. उलट काश्मीरमध्ये फिल्मसिटी उभारली पाहिजे. ...तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बंगल्यासमोर धनगरी ढोल वाजवणार- गोपीचंद पडळकर व्यसनं कोणत्या क्षेत्रात नाहीत? काहींना पैशाचे व्यसन असते असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईचे वलय अजिबात कमी होणार नाही. मुंबादेवीचे महत्व कमी होणार नाही. कितीही कार्यालये हलवली तरी ही मुंबई झळाळणारच आहे. शिवसेना हा कधीही गोंधळलेला पक्ष नव्हता आणि नाही. आम्हाला जे वाटते तशीच भूमिका आम्ही घेतो. त्यासाठी आम्ही कुणाचीही पर्वा करत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sanjay Raut (Politician)

    पुढील बातम्या