Home /News /pune /

पुण्यात लसीकरणाच्या नावाखाली नागरिकांचा डेटा चोरी, राष्ट्रवादीचा भाजप नगरसेवकांवर गंभीर आरोप

पुण्यात लसीकरणाच्या नावाखाली नागरिकांचा डेटा चोरी, राष्ट्रवादीचा भाजप नगरसेवकांवर गंभीर आरोप

पुणे शहरात भाजप नगरसेवक लसीकरणाच्या (Vaccination) नावाखाली नागरिकांचा खासगी डेटा (Personal Data) चोरत असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

पुणे 22 मे : पुणे शहरासह देशभरात सध्या लसीकरण (Vaccination) सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी सरकारनं ऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online Registration) बंधनकारक केलं आहे. त्यामुळे, लस (Vaccine) घेण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं रजिस्ट्रेशन केंद्र सरकारच्या कोविन अॅपमध्ये ऑनलाईन तसंच ऑफलाईनही केलं जातं. नागरिकांचा हा डेटा (Personal Data) अत्यंत सुरक्षित असणं गरजेचं आहे. केंद्र व राज्य सरकारच्या गोपनीय कायद्यानुसार हा डेटा कुठल्याही राजकीय पक्षाला व्यवसायिक आस्थापनांना देता येत नाही. मात्र, पुण्याच भलतीच परिस्थिती आहे. शहरात भाजप नगरसेवक लसीकरणाच्या नावाखाली नागरिकांचा डेटा चोरत असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. पुणे शहरात विविध केंद्रावर लसीकरण नोंदणीचा डेटा भाजप नगरसेवकांनी बेकायदेशीररित्या मिळवला आहे. त्या डेटावरील मोबाईल नंबरवर नगरसेवकांकडून लसीकरण झालेल्या नागरिकांना केंद्र शासनाचे सर्टिफिकेट पाठवले जात आहेत. तसंच यातून ते स्वतःचा प्रचार करत आहेत. ही गंभीर बाब आहे, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. या डेटामध्ये प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक, खासगी, व्यवसायिक तसंच मालमत्तेविषयीची माहिती लिंक असल्यामुळे त्या प्रत्येक नागरिकाचे व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आले असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. हेही वाचा - कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणं फायदेशीर, संशोधनातून स्पष्ट बेकायदेशीररित्या नागरिकांचा डेटा चोरणं चुकीचं असून संविधानाने दिलेल्या गोपनीय कायद्याचा भंग भाजप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. हेही वाचा -  ब्लॅक फंगस रोगावरील उपचार खर्च कमी करण्याची मागणी, काय आहे ट्रीटमेंट?
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Corona vaccine, Pune, User data

पुढील बातम्या