Home /News /national /

ब्लॅक फंगस रोगावरील उपचार खर्च कमी करण्याची मागणी, काय आहे ट्रीटमेंट?

ब्लॅक फंगस रोगावरील उपचार खर्च कमी करण्याची मागणी, काय आहे ट्रीटमेंट?

‘ब्लॅक फंगस या रोगावरील औषधोपचार (Black Fungus Treatment) खूपच महाग (Expensive)असल्यानं सर्वसामान्य माणसाच्या ते आवाक्याबाहेरचं आहे.

नवी दिल्ली, 22 मे : कोरोना साथीच्या रोगानंतर आता देशभरात ब्लॅक फंगस (Black Fungus)अर्थात काळी बुरशी या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मृत्यूचे प्रमाण (Death Rate) 50 टक्क्यांपर्यंत असलेल्या या रोगाचा प्रसार रोखणं हे एक मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर या रोगावरील उपचारांसाठी येत असलेल्या मोठ्या खर्चामुळे लोकांची चिंता वाढली आहे. त्यामुळं आता या ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी रोगाच्या उपचाराचा खर्च कमी करण्यात यावा अशी मागणी होत आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी-CAIT) यांनी केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मंडावीया यांना एक पत्र लिहून या रोगावरील आवश्यक औषधांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे. EXPLAINER : काय आहे व्हाईट फंगस? ब्लॅक फंगसपेक्षा अधिक धोकादायक का? ‘ब्लॅक फंगस या रोगावरील औषधोपचार (Treatment) खूपच महाग (Expensive)असल्यानं सर्वसामान्य माणसाच्या ते आवाक्याबाहेरचं आहे. यावरील उपचारात वापरल्या जाणार्‍या प्रत्येक इंजेक्शनची किंमत सुमारे सात हजार रुपये आहे. दीर्घकाळ चालणार्‍या या आजाराच्या उपचारांसाठी एखाद्या व्यक्तीला सुमारे 70ते 100 इंजेक्शन्स लागू शकतात. हा खर्च परवडणं प्रत्येकाला शक्य नाही,’ असं या संघटनेनं म्हटलं आहे. ‘आधीच कोरोना साथीमुळे लोक त्रासले आहेत. त्यात नोकरी,उद्योग धंद्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आशा परिस्थितीत या नवीन रोगानं आणि त्याच्या उपचारासाठी येणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाच्या भीतीनं लोक हादरले आहेत. त्यामुळं या आजारवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांच्या (Medicines) किंमती कमी करणं गरजेचं आहे,’ असं मत या संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केलं आहे. यामुळे आहेत उपचार महाग : मॅक्स हेल्थकेअरचे (Max Healthcare) वरिष्ठ सल्लागार डॉ. निशेष जैन यांच्या मते, ‘ब्लॅक फंगसवरील उपचारात आवश्यक असणारी अ‍ॅम्फोटेरिसिन बी लिपोझमलची इंजेक्शन्स ही रुग्णाच्या वजनानुसार दिली जातात. प्रति किलो तीन ते पाच मिली ग्रॅम या प्रमाणात अ‍ॅम्फोटेरिसिन बी लिपोझमल इंजेक्शन दिले जाते. एखाद्याचे वजन 60किलो असेल तर त्याला दररोज प्रति किलो तीन मिलीग्राम या प्रमाणे दररोज 180 मिलीग्रामचे इंजेक्शन द्यावे लागेल. त्यामुळे याची किंमत वाढते.’ Corona Third Wave : खरंच कोरोनाची तिसरी लाट येणार का? काय आहे तिचा धोका? ‘हा आजार फक्त डोळ्यापुरता (Eyes) मर्यादित नसून तो मेंदू (Brain) आणि नाकापर्यंतही (Nose) पोहोचतो. या भागांना तो मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवतो. त्यामुळं रुग्णाची दररोज तपासणी करून,त्यानुसार औषधाची मात्रा वाढविली जाते. मूत्रपिंडावरही (Kidney)याचा परिणाम होतो. त्यामुळं रोज केएफटी (Kidney Function Test) करावी लागते. त्यासाठी देखील औषधे दिली जातात. बर्‍याच रुग्णांवर दोन दोन महिने उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत,आधीच महाग असलेल्या इंजेक्शन्सची दीर्घकाळ गरज पडत असल्यानं उपचाराचा खर्च प्रचंड वाढतो,’ असं डॉ. जैन यांनी स्पष्ट केलं.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या