रायचंद शिंदे, प्रतिनिधी
पुणे, 27 एप्रिल : लोकसभा निवडणुकांसाठीचं मतदान चौथ्या आणि अंतिम टप्प्यात आलं असताना आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपस्थित होते. या सभेमध्ये अजित पवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.
'नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. पण तरी देखील ते एखाद्या घराण्यावर बोलतात. नेहरु, गांधी यांच्यावर ते टीका करतात ठीक आहे पण पवारांनी त्यांचं काय घोडं मारलं' असं अजित पवार म्हणाले आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणातून पवार घराण्यावर टीका केली. पण पवारांनी काय घोडं मारलं असं अजित पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदान करा असं आवाहन जनतेला केलं. 'आमचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे शिकलेले आहे. MBBS आहे. जर काय काम आलं तर काम करून घ्या, जर काय दुखत असेल तर इंजेक्शन घ्या.' असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : 'राज ठाकरेंवर टीका केली तर त्याला मारणारच, अनुभवायचं असेल तर बोलून बघा'
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. 'नोटबंदी केल्यापासून किती काळ पैसा जमा केला याचा हिशोब का देत नाही' असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. समाजातील प्रत्येक घटक अडचणीत असून प्रत्येक गोष्टीत महागाई होत चालली आहे. आज नद्यांची काय अवस्था आहे. सगळी नदी हिरवीगार आहे. हेलिकॉप्टरमधून फिरत असताना यांना नदी दिसत नाही का?'
ते पुढे म्हणाले की, 'सरकारला कुठलीही ठोस भूमिका मांडता येत नाही. म्हणून, गांधी, नेहरू यांच्यावर टीका सुरू आहे. तोंडात राम अन...पोटात नथुराम आहे' अशी टीका करताना अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
'उद्धव ठाकरे म्हणतात शेतक-यांचा कैवारी आहे. मग कर्जमाफी देताना कुठे होतात, वीज दर वाढले, शेतमालाला हमीभाव दिला नाही. शिवसेनेला फक्त पैसा पाहिजे आहे. पैशातुन सत्ता अन सत्तेतुन पैसा पाहिजे आहे.' अशी जहरी टीका अजित पवारांनी केली.
VIDEO : भरसभेत नितीन गडकरींना आली भोवळ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Election 2019, Lok sabha election 2019, Shirur S13p36