अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी
मुंबई, 27 एप्रिल : लोकसभा निवडणुकांसाठीचं मतदान अंतिम टप्प्यात आलं असताना आता आरोपांच्या फैरी वाढल्या आहेत. अशाच मनसे सरचिटनीस संदीप देशपांडे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
'आशिष शेलारांना सभा घ्यायची होती तर एकदा कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरे़कडून धडे घ्यायचे होते अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी शेलारांवर टीका केली आहे. राज ठाकरेंबाबत जर कोणी खालच्या पातळीवर बोलले तर आम्ही त्याला मारणारच. त्यामुळे तुम्हाला अनुभवायचे असेल तर बोलून बघा' असंही संदीप देशपांडे म्हणाले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना आशिष शेलार यांनी त्यांच्या स्टाईलनं प्रत्युत्तर दिलं होतं. बघाच तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी केलेले सर्व आरोप भाजपनं फेटाळून लावले होते. राज ठाकरेंच्या 32 प्रकरणांचा आढावा घेण्याची आमची तयारी पण वेळेअभावी 19 प्रकरणं दाखवली, असं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं होतं. राज ठाकरे यापूर्वी राहुल गांधी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोलले होते. त्यांच्यावर कशी टीका केली होती. ते राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ दाखवले. खोटे व्हिडिओ दाखवून भाजप जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहात, अशी टीकाही शेलार यांनी केली होती. त्यावर आता मनसे आणि भाजपमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत.
हेही पाहा: VIDEO : राज ठाकरेंच्या 'लाव रे त्या व्हिडिओ'बद्दल आशिष शेलार म्हणतात...
संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, 'बलात्काराची आकडेवारी कमी झाल्याचा मुख्यमंत्र्याचा व्हिडीओ शेलारांनी दाखवला. पण आम्ही राज्यातील नाही देशातील आकडेवारी बाबत बोलत होते. अमित शहा यांनी बालाकोटच्या 250 मृतांचा आकडा दिला आहे. आम्ही त्याचा पुरावा मागितला. त्यामुळे आशिष शेलारांच्या व्हिडिओत दम नव्हता मात्र तरीही आम्ही उत्तर देतो'
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एका महिलेला बोलावलं होतं. ही महिला म्हणजे भाजपाच्या पेपरमधील जाहिरातीत लाभार्थी म्हणून ज्या महिलेचा फोटो वापरला गेला ती महिला होती. यावेळी सदर महिलेनी भाजपाची पोलखोल केली. सरकारने माझ्या बाबात खोटी माहिती जाहिरातीत प्रसिद्ध केल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.
संदीप देशपांडे यांच्या या पोलखोलीवर आता भाजप कशा पद्धतीने उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
VIDEO : भरसभेत नितीन गडकरींना आली भोवळ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.