• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुणे: शेजारच्या इमारतीतील लेकही मदतीला नाही येऊ शकला; एकट्या राहणाऱ्या आईचा भयावह अंत

पुणे: शेजारच्या इमारतीतील लेकही मदतीला नाही येऊ शकला; एकट्या राहणाऱ्या आईचा भयावह अंत

Murder in Pune: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका हृदय हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. सिंहगड रोड परिसरातील हिंगणे खुर्द येथील एका इमारतीत एकट्या राहणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.

 • Share this:
  पुणे, 31 ऑक्टोबर: पुण्यातील (Pune) सिंहगड रोड परिसरात एका हृदय हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. सिंहगड रोड परिसरातील हिंगणे खुर्द येथील एका इमारतीत एकट्या राहणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला (Murder of a woman living alone) आहे. अज्ञात चोरट्याने महिलेच्या डोक्यात वजनदार वस्तूने वार करत त्यांची हत्या (Brutal murder) केली आहे. यावेळी चोरट्याने घरातील 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने देखील चोरून (robbed 1.7 lakh worth ornaments) नेले आहेत. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ओळखीतील लोकांनीच ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. शालिनी बबन सोनावणे असं हत्या झालेल्या 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेचं नाव असून त्या हिंगणे खुर्द येथील सायली अपार्टमेंटमध्ये एकट्या राहत होत्या. तर त्यांचा 39 वर्षीय मुलगा विराट बबन सोनवणे हा शेजारच्याच इमारतीत राहत होता. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने शालिनी यांच्या घरात शिरून त्यांची निर्घृण हत्या केली आहे. तसेच घरातील 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. हेही वाचा-दुहेरी हत्याकांडाने सांगली हादरली; बापाचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला राक्षस याप्रकरणी मुलगा विराट बबन सोनवणे याने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शालिनी सोनवणे या सायली अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या. तर त्यांचा मुलगा विराट हा जवळच्याच एका इमारतीत वास्तव्याला आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास विराट आपल्या आईला भेटायला गेला होता. हेही वाचा-आधी कट मारला मग फरफटत नेत ST चालकाला चिरडलं; नाशकात कंटेनर चालकाचं निर्दयी कृत्य यावेळी आई शालिनी सोनवणे या हॉलमध्ये मृतावस्थेत पडल्याच त्यांना आढळल. त्यांच्या डोक्यावर जबरी वस्तूने जोरदार वार केल्याचं प्रथमदर्शनी वाटत होतं. आईची हत्या झाल्याचं लक्षात येताच विराट यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दरोडा आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: