• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • दुहेरी हत्याकांडाने सांगली हादरली; बापाचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला राक्षस; चौघांना केलं रक्तबंबाळ

दुहेरी हत्याकांडाने सांगली हादरली; बापाचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला राक्षस; चौघांना केलं रक्तबंबाळ

Crime in Sangli: सांगलीत शुक्रवारी दुहेरी हत्याकांडाची (Double murder) घटना घडली आहे. बापाला झालेल्या मारहाणीचा (Father beaten by 3 people) बदला घेण्यासाठी एका तरुणाने आपल्या एका मित्राच्या मदतीने चार जणांना बेदम मारहाण केली आहे.

 • Share this:
  सांगली, 31 ऑक्टोबर: सांगली (Sangli) जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे शुक्रवारी दुहेरी हत्याकांडाची (Double murder) घटना घडली आहे. बापाला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने आपल्या एका मित्राच्या मदतीने चार जणांना बेदम मारहाण (son beat 4 people with the help of friend) केली आहे. आरोपींनी लाथा बुक्क्या, काठी, ऊस अशा मिळेल त्या वस्तूने मारहाण करत चार युवकांना अक्षरश: रक्तबंबाळ केलं आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एकाचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. दुहेरी हत्याकांडाच्या या थरारक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुख्य संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे याला अटक केली आहे. तर त्याचा अन्य एक साथीदार विशाल तानाजी चव्हाण फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहापूर येथील रहिवासी असणारे गणेश कोळी, गोरख कावरे आणि विजय माने यांनी गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास किरकोळ कारणावरुन या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. आपल्या वडिलांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच मुख्य आरोपी मधुकर मोरे याला संताप अनावर झाला. हेही वाचा-आधी सुसाइड नोट लिहून घेतली मग दिला भंयकर मृत्यू; महिलेच्या हत्येनं मुंबई हादरली! नेमकं काय घडलं? बापाला मारहाण झाल्याने संतापलेल्या मधुकर मोरे याने आपल्या विशाल चव्हाण नावाच्या मित्राला सोबत घेत चारही आरोपींना मारण्याचा प्लॅन बनवला. शुक्रवारी रात्री आरोपींनी  गणेश कोळी, गोरख कावरे आणि विजय माने या तिघांना काठी, दांडके, ऊस अशा मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी संबंधित तिघांचा मित्र असणाऱ्या संदीप चव्हाण नावाच्या तरुणाला घराबाहेर बोलवून त्यालाही अमानुष मारहाण केली आहे. या भयंकर मारहाणी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने संदीप चव्हाण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. हेही वाचा-झोपेतच पत्नीला संपवलं;काही तासात भयावह अवस्थेत आढळला पती, जळगावातील खळबळजनक घटना तर विजय माने हा गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना माने याचा देखील मृत्यू झाला आहे. दुहेरी हत्याकांडाची घटना घडताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी मधुकर मोरे याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार विशाल चव्हाण मात्र फरार झाला आहे. आरोपी विशाल चव्हाणच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. या घटनेचा पुढील तपास कडेगाव पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: