मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

PSIच्या जाहिरातीत धनगर समाजाला केवळ 2 जागा तर वंजारी समाजाच्या नशिबी पुन्हा शून्य!

PSIच्या जाहिरातीत धनगर समाजाला केवळ 2 जागा तर वंजारी समाजाच्या नशिबी पुन्हा शून्य!

राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने पुन्हा एकदा समांतर आरक्षणाच्या आडून वंजारी आणि धनगर समाजाच्या परीक्षार्थींवर पुन्हा एकदा अन्याय केल्याचा गंभीर आरोप होत आहे.

राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने पुन्हा एकदा समांतर आरक्षणाच्या आडून वंजारी आणि धनगर समाजाच्या परीक्षार्थींवर पुन्हा एकदा अन्याय केल्याचा गंभीर आरोप होत आहे.

राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने पुन्हा एकदा समांतर आरक्षणाच्या आडून वंजारी आणि धनगर समाजाच्या परीक्षार्थींवर पुन्हा एकदा अन्याय केल्याचा गंभीर आरोप होत आहे.

पुणे,29 फेब्रुवारी: राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने पुन्हा एकदा समांतर आरक्षणाच्या आडून वंजारी आणि धनगर समाजाच्या परीक्षार्थींवर पुन्हा एकदा अन्याय केल्याचा गंभीर आरोप होत आहे. शुक्रवारी याच मुद्यावरून पुण्यात या दोन्ही समाजाच्या एमपीएससी परीक्षार्थींनी तीव्र आंदोलन केलं. तेव्हा कुठे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी ही अन्यायकारक जाहिरात रद्द करायला लावून आंदोलक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या आरक्षित जागा कसल्याही परिस्थितीत मिळवून देऊ, असं आश्वासन 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना दिलं आहे. MPSC कडून धनगर, वंजारी समाजावर पुन्हा अन्याय करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. PSI च्या जाहिरातीत धनगर समाजाला अवघ्या 2 जागा तर वंजारी समाजाच्या नशिबी पुन्हा एकदा भोपळा आला आहे. यामुळे पुण्यात धनगर आणि वंजारी समाजाचे विद्यार्थी पुन्हा एकदा एमपीएससी विरोधात आक्रमक बनले आहेत. कारण पीएसआयच्या 650 जागांच्या जाहिरातीमध्ये या दोन्ही प्रवर्गांना पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातीमध्ये आरक्षित कोट्यानुसार धनगर समाजाला 24 जागा मिळणे अपेक्षित आहे. पण या जाहिरातीत मिळाल्यात अवघ्या 2 जागा. वंजारी समाजाला तर या जाहिरातीत अक्षरशः शुन्य जागा मिळाल्यात. हेही वाचा...फर्ग्युसनमध्ये ‘मी सावरकर’ला विरोध, विद्यार्थ्यांचा रोष पाहून शरद पोंक्षेंनी मागच्या दरवाजाने केली एण्ट्री आरक्षित कोट्यानुसार या वंजारी समाजाला किमान 13 जागा मिळणं अपेक्षित आहे. पण सरप्लसच्या नावाखाली एमपीएससीने या समाजाला पीएसआयच्या जाहिरातीत एकही जागा सोडलेली नाही. म्हणूनच वर्षांनुवर्षे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचे भवितव्य अक्षरशः अंधकारमय बनले आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त करतात समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे खडबडून जागे झाले आणि आणि त्यांनी ट्वीट करून आपण आंदोलक विद्यार्थ्यांसोबत असल्याचं त्यांना जाहीर करावं लागलं. आपण कसल्याही परिस्थितीत एमपीएससीची ही अन्यायकारक जाहिरात रद्द करवून घेऊ आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन धनंजय मुंडे दिले आहे. हेही वाचा...आणखी एक हिंगणघाट! प्रेमाला नकार दिला म्हणून 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जिवंत जाळलं एमपीएससी खरंतर गेल्या चार वर्षांपासून सरप्लसच्या नावाखाली एनटी प्रवर्गाच्या मुलांना त्यांच्या हक्काच्या जागा नाकारत आले आहे. याविरोधात पीडित विद्यार्थी थेट हायकोर्टापर्यंत लढले आणि जिंकलेत देखील पण तरीही एमपीएससीने पुन्हा एकदा समातंर आरक्षणाचं कारण देत एनटी सी आणि एनटी डी प्रवर्गाच्या मुलांवर अन्याय केल्याचं बघायला मिळत आहे. म्हणूनच आता सत्तेत असलेले या समाजाचे मंत्री तरी आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार का, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा...हे राम! चक्क दारूने घातली अंघोळ, दारूबंदी असणाऱ्या गांधीजींच्या गुजरातमधला धक्कादायक VIDEO
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra news, MPSC, Mpsc exam, Mpsc exam result, Pune news

पुढील बातम्या