जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हे राम! चक्क दारूने घातली अंघोळ, दारूबंदी असणाऱ्या गांधीजींच्या गुजरातमधला धक्कादायक VIDEO

हे राम! चक्क दारूने घातली अंघोळ, दारूबंदी असणाऱ्या गांधीजींच्या गुजरातमधला धक्कादायक VIDEO

हे राम! चक्क दारूने घातली अंघोळ, दारूबंदी असणाऱ्या गांधीजींच्या गुजरातमधला धक्कादायक VIDEO

गुजरातमध्ये 1960 पासून गुजरातमध्ये दारूबंदी आहे. असंख्य वेळा अवैध दारूची विक्री झाल्याच्या घटना समोर येत असतात. आता एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दारू प्यायलेल्या या तरुणांचा धिंगाणा पाहून तुम्ही थक्कच व्हाल.

  • -MIN READ
  • Last Updated :

कच्छ, 29 फेब्रुवारी : देशातील ज्या काही मोजक्या राज्यांमध्ये दारूबंदी आहे, त्या राज्यांच्या यादीमध्ये गुजरात राज्याचं नाव अग्रक्रमाने घेण्यात येतं. गुजरात हे नवं राज्य म्हणून अस्तित्त्वात आल्यापासून गुजरातमध्ये दारूबंदी (Liquor Ban in Gujarat) आहे. 1960 पासून त्यांची अंंमलबजावणी करण्यात येत आहे. गुजरातमधील दारूबंदीचा निर्णय फक्त कागदोपत्री असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळतं आहे. अनेकदा महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, दीव आणि दमणमधून अवैधरित्या दारू गुजरातमध्ये आणली जात असल्याचा आरोप नेहमी करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये दारू खुलेआम विकली जात असल्याची प्रचिती आली आहे. गुजरात राज्यातील कच्छमधून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल. (हेही वाचा- हॉर्नमधून ऐकू आली ‘ही’ धून, लोकांनी ट्रक भररस्त्यात थांबवत म्हटलं ‘फिरसे बजाओ..’) कच्छमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभातील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये काही तरुण दारूने अंघोळ करत आहेत. एकमेकांवर दारू ओतून बॉलीवूडच्या एका गाण्यावर थिरकताना ते दिसत आहेत. मुद्रा तालुक्यातील कांडागरा याठिकाणचा हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळते आहे. लग्नामध्ये दांडियारास खेळायला सुरूवात झाल्यानंतर या तरूणांनी अशाप्रकारे धिंगाणा घालायला सुरूवात केली. तिथेच उपस्थित पाहुण्यांपैकी कुणीतरी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

जाहिरात

गुजरातमध्ये पूर्ण राज्यामध्ये दारूबंदी असताना या तरुणांकडे एकमेकांवर ओतण्या इतपत दारू आली कुठून असा सवाल विचारला जात आहे. गुजरातमध्ये दारू विक्री आणि खरेदी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या तरुणांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात