Home /News /crime /

आणखी एक हिंगणघाट! प्रेमाला नकार दिला म्हणून 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जिवंत जाळलं

आणखी एक हिंगणघाट! प्रेमाला नकार दिला म्हणून 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जिवंत जाळलं

ही मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला आणि नंतर तिला पेटवून दिलं गेलं.

    हैदरबाद, 29 फेब्रुवारी :  आपल्या प्रेमाला नकार दिला म्हणून चिडून एका नराधमाने 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. एवढंच नाही तर त्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. घरात ही मुलगी एकटी असताना हे कृत्य त्यानं केलं. मुलीने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना वर्दी दिली. या घटनेत मुलगी 50 टक्के भाजली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात हिंगणघाट इथे एका प्राध्यापिकेला अशाच प्रकारे जिवंत जाळण्यात आलं होतं. आताची ताजी घटना घडली आहे तेलंगणमध्ये. सूर्यपेट जिल्ह्यात एका गावात ही भयंकर घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षांचा तरुण या पीडित मुलीला माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं सांगत त्रास देत होता. या मुलीच्या मागे लागणं बंद कर आणि तिचा नाद सोडून दे असं मोठ्यांनी त्याला बजावलं होतं. पण तरीही त्यानं ऐकलं नाही. ही मुलगी घरात एकटं असल्याचं पाहून तो तिच्या घरी गेला. तिला बळजबरीने घराजवळच्या झुडपांकडे नेलं आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप घरच्यांनी केला आहे. या पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. वाचा - पोलिसांच्या अंगावर थुंकला कैदी, भयानक प्रकाराचा VIDEO VIRAL या मुलाविरोधात खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला होता. पण  असून पोलीस तपास करत आहेत. विदर्भात काही दिवसांपूर्वी हिंगणघाटच्या रस्त्यावर भर दिवसा अशीच घटना घडली होती. प्रेमाला प्रतिसाद देत नाही, म्हणून एका विवाहित तरुणाने कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या तरुणीला भर रस्त्यात पेटवून दिलं. या धक्कादायक घटनेनं राज्यच नाही तर देश हादरला होता. या घटनेत 70 टक्के भाजलेल्या तरुणीचा जीवनासाठीचा संघर्ष दुर्दैवाने अपयशी ठरला. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा अंत झाला. तेलंगणाच्या घटनेत पीडित तरुणी जवळजवळ 50 टक्के भाजली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. अन्य बातम्या पुन्हा तेच! फाशीच्या 3 दिवस आधी निर्भयाच्या गुन्हेगाराने केली आणखी एक याचिका उद्धव ठाकरेंच्या भाषणावर उर्मिला मातोंडकर फिदा, ते भाषण तुम्ही ऐकलं का?
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Crime Against Woman, Telangana (Location)

    पुढील बातम्या