मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

दसऱ्याच्या दिवशीच एकुलता एक मुलगा बनला राक्षस; आईसोबत केलेल्या कृत्यानं पुणे हादरलं!

दसऱ्याच्या दिवशीच एकुलता एक मुलगा बनला राक्षस; आईसोबत केलेल्या कृत्यानं पुणे हादरलं!

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

दसऱ्याच्या दिवशी एकुलत्या एक मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृणपणे हत्या (Mother Brutal Murder) केली आहे. नराधमाने लाकडी दांडक्याने मारहाण आणि धारदार सुरीने वार करत आईला संपवलं आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 18 ऑक्टोबर: कुटुंबाचा वंश पुढे चालवण्यासाठी पोटी मुलगा जन्माला यावा, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी कुटुंबीय काहीही करायला तयार होतात. पुण्यातील एका कुटुंबीयांची देखील अशीच इच्छा होती. त्यांना सहा मुली झाल्यानंतरही त्यांना वंशाचा दिवा हवा होता. अखेर सहा मुलींनंतर त्यांना मुलगा झाला. पण याच मुलाने आईच्या प्रेमाचे पांग फेडलं आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी एकुलत्या एक मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृणपणे हत्या (Mother Brutal Murder) केली आहे. नराधमाने लाकडी दांडक्याने मारहाण आणि धारदार सुरीने वार करत आईला संपवलं आहे.

मायलेकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. आईची हत्या केल्यानंतर नराधम आरोपी फरार झाला होता. पण पोलिसांनी पुण्यानजीक असणाऱ्या एका जंगलातून त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस आरोपी मुलाची कसून चौकशी करत असून याचा पुढील तपास पोलीस करत आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशीच आरोपीनं आईची हत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-जुळ्या भावांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र; 25 व्या मजल्यावरून पडून झाला अंत

सचिन कुलथे असं अटक केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. तर विमल कुलथे असं हत्या झालेल्या मातेचं नाव आहे. आरोपी मुलगा सचिन हा आपल्या पत्नीसह आईसोबत राहत होता. सचिनला दारूचं व्यसन असल्याने त्याचं कुटुंबीयांसोबत सतत वाद होत होता. त्यामुळे आरोपी सचिनची पत्नी देखील एक वर्षापूर्वी माहेरी गेली होती. त्यामुळे सचिन आपल्या आईसोबतच राहत होता. दरम्यान आरोपीनं आपल्या आईकडे दारूसाठी पैसे मागितले होते. पण आईने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला.

हेही वाचा-लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण;ब्रिगेडीयरचं कनेक्शन समोर

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आरोपी सचिनने शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी आईला लाकडी दांडक्याने आणि सुरीने बेदम मारहाण केली. या मारहाणीतच 60 वर्षीय आईचं निधन झालं आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पण पोलिसांनी पुण्यानजीक असणाऱ्या एका जंगलातून त्याची उचलबांगडी केली आहे. विशेष म्हणजे घटस्थापने दिवशी आरोपीनं आपल्या आीला मारहाण केली होती. घटस्थापनेसाठी माहेरी आलेल्या मुलीने आईच्या अंगावरील मारहाणीचे व्रण पाहिले होते. पण पोलिसांत तक्रार केली तर, आरोपी आणखी जास्तच मारेल, या भीतीने मायलेकी घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती.

First published:

Tags: Crime news, Murder, Pune