जाहिरात
मराठी बातम्या / देश / जुळ्या भावांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र; इमारतीच्या 25 व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी अंत

जुळ्या भावांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र; इमारतीच्या 25 व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी अंत

सूर्य नारायण आणि सत्य नारायण असं संबंधित दोघा मृत भावांची नावं आहे. (File Photo)

सूर्य नारायण आणि सत्य नारायण असं संबंधित दोघा मृत भावांची नावं आहे. (File Photo)

रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एका उंच इमारतीच्या 25 व्या मजल्यावरून खाली पडून (twin brothers fell from the 25th floor) जुळ्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू (Both died) झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एका उंच इमारतीच्या 25 व्या मजल्यावरून खाली पडून (twin brothers fell from the 25th floor) जुळ्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू (Both died) झाला आहे. एकाच दिवशी जन्म आणि दुर्दैवी पद्धतीने एकाच दिवशी मृत्यू आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 25 व्या मजल्यावरून ते दोघं नेमके कसे खाली पडले, याचं गूढ बनलं असून पोलिसांनी चहुबाजूंनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी मृत मुलाच्या आईची चौकशी केली असून अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थ विहार सोसायटीत घडली आहे. तर सूर्य नारायण आणि सत्य नारायण असं संबंधित दोघा मृत भावांची नावं आहे. 14 वर्षीय मृत भावंडं मध्य रात्री फ्लॅटच्या गॅलरीत खेळत होते. खेळत असताना दोन्ही भाऊ अचानक खाली पडले आहेत. या घटनेच्या वेळी मृत मुलांची आई आणि बहीण घरातच होते. तर वडील कामानिमित्त मुंबईला गेले होते. हेही वाचा- लग्नाचं गोड स्वप्न दाखवून लावायचे चुना; साताऱ्याच्या बंटी-बबलीला ठोकल्या बेड्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घरातील सर्वजण झोपायला गेले होते. दरम्यान 14 वर्षीय सत्य नारायण आणि सूर्य नारायण फ्लॅटच्या गॅलरीत खेळत होते. दरम्यान अचानक रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दोघे भाऊ इमारतीच्या 25 व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडले आहेत. एवढ्या उंचावरून कोसळल्याने दोघांचाही जागीचं मृत्यू झाला आहे. ही घटना उघडकीस येताच सोसायटीत एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा- कर्ज काढून मॅनेजरला दिले पैसे पण..; फसवणूक झाल्यानं तरुणानं उचललं टोकाचं पाऊल या घटनेची माहिती मिळताच विजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच रात्री घरातील सर्वजण झोपायला गेल्यानंतर, नेमकं काय घडलं. दोघंही रोलिंग ओलांडून पलिकडे कसे गेले? हा अपघात आहे की घातपात अशा सर्व प्रश्नांबाबत गूढ बनलं असून पोलीस तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात