मराठी बातम्या /बातम्या /देश /

पुणे: लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; ब्रिगेडीयरचं कनेक्शन आलं समोर

पुणे: लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; ब्रिगेडीयरचं कनेक्शन आलं समोर

पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या ( female Lieutenant Colonel commits suicide) केली होती.

    पुणे, 17 ऑक्टोबर: पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या ( female Lieutenant Colonel commits suicide) केली होती. संबंधित महिलेनं ऑफिसर मेसमध्येच गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. भारतीय सैन्यातील बड्या पदावरील महिलेनं अशाप्रकारे आत्महत्या केल्यानंतर, लष्करी प्रशासनात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत घटनेच्या तपासाला सुरुवात केली होती. या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून वानवडी पोलिसांनी ब्रिगेडियर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अजित मिलू असं गुन्हा दाखल झालेल्या ब्रिगेडिअर लष्करी अधिकाऱ्याचं नाव असून ते हिमाचल प्रदेशातील सिमला येथील बिग्रेडियर जनरल स्टाफ, हेड क्वॉटर्स, आर्मी ट्रेनिंग कमांड येथे वास्तव्याला आहेत. आरोपी ब्रिगेडिअरने मृत लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ( immoral relationship with Brigadier) ठेवून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार केले होते. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral obscene videos) देत आरोपी कनिष्ठ महिला अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत होता. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी ब्रिगेडिअर महिलेला त्रास देत होता. हेही वाचा-गरोदर महिलेस डॉक्टरकडून अमानुष मारहाण; पुण्यातील हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार याच त्रासातून लेफ्टनंट कर्नल असणाऱ्या 42 वर्षीय महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांचे पती देखील जयपूर येथे लष्करी सेवेत आहेत. आत्महत्येच्या घटनेनंतर ते पुण्यात आले होते. दरम्यान त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वानवडी पोलिसांनी ब्रिगेडिअर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मृत महिला या सिमला येथे सेवेवर होत्या. आरोपी वरिष्ठ अधिकारी बिग्रेडियर अजीत मिलू याने प्रेमाचं नाटक करत पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. हेही वाचा-कर्ज काढून मॅनेजरला दिले पैसे पण..; फसवणूक झाल्यानं तरुणानं उचललं टोकाचं पाऊल तसेच आरोपीनं पीडित महिलेशी शारीरिक संबंध ठेवून त्यांचे अश्लील व्हिडीओ देखील आपल्या मोबाइलवर शूट केले. यानंतर आरोपी संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी पीडित महिलेला देत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून लेफ्टनंट कर्नल महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Suicide

    पुढील बातम्या