पुणे, 19 नोव्हेंबर: पुण्यातील (Pune) तळवडे येथील रहिवासी असणाऱ्या एका महिलेनं 5 वर्षांपूर्वी आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून त्याची निर्घृण हत्या (Brutal murder) केली होती. याप्रकरणी पाच वर्षे सुनावणी केल्यानंतर, न्यायालयाने आपला निर्णय दिला असून दोषी आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर सात हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल सत्र न्यायाधीश जी पी अगरवाल यांनी सुनावला आहे.
स्वाती विक्रम माळवदकर असं शिक्षा झालेल्या 25 वर्षीय दोषी महिलेचं नाव असून ती पुण्यातील तळवडे येथील रहिवासी आहे. 02 ऑगस्ट 2016 रोजी तिने आपल्या पोटच्या लेकराला विष पाजून त्याची हत्या केली होती. याबाबत दोषी स्वातीचे दीर श्रीकांत माळवदकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. निगडी पोलिसांनी घटनेचा तपास केल्यानंतर, हे प्रकरणाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू होती. घटनेच्या पाच वर्षांनंतर सर्व पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने आई स्वाती यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा-लग्नासाठी आईला प्रपोज अन् मुलीशी थाटला संसार;डबल गेम करणाऱ्या जावयाचा खेळ खल्लास
नेमकी घटना काय आहे?
घटनेच्या एक वर्ष आधी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ विक्रम माळवदकर आपल्या आई-वडिलांसोबत एकत्र राहत होते. पण दोषी स्वाती यांना एकत्र कुटुंबात राहायचं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले. या वादातून स्वाती यांचे सासू-सासरे गावी जाऊन राहू लागले. पण सर्वांनी एकत्र राहावं, अशी पती विक्रम याची इच्छा होती. त्यामुळे विक्रम आणि स्वाती यांच्याच बऱ्याचदा वाद झाला होता.
हेही वाचा-अभ्यासासाठी दुसऱ्या मजल्यावर गेली अन्...; बंद खोलीत मुलीचं धक्कादायक कृत्य
घटनेच्या दिवशी वाद झाल्यानंतर स्वाती यांनी विक्रम यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे विक्रम यांनी आपला भाऊ श्रीकांत याला घरी जाण्यास सांगितलं. त्यावेळी श्रीकांत घरी गेला असता, तीन वर्षीय पुतण्या अंथरुणात निपचित पडलेला दिसला. तर वहिनी स्वाती या घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या दिसल्या. ही घटना उघडकीस येताच श्रीकांत यांनी दोघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल केले. पण याठिकाणी जाताच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर स्वाती यांच्यावर काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. दीर श्रीकांत यांच्या फिर्यादीवरून निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. याप्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Pune