मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

औरंगाबाद: अभ्यासासाठी दुसऱ्या मजल्यावर गेली अन् भयावह अवस्थेत आढळली; बंद खोलीत मुलीचं धक्कादायक कृत्य

औरंगाबाद: अभ्यासासाठी दुसऱ्या मजल्यावर गेली अन् भयावह अवस्थेत आढळली; बंद खोलीत मुलीचं धक्कादायक कृत्य

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Aurangabad: औरंगाबाद शहरातील मोंढा परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. याठिकाणी दुसऱ्या मजल्यावर अभ्यासासाठी गेलेली बारावीची विद्यार्थिनी भयावह अवस्थेत आढळली आहे.

  • Published by:  News18 Desk

औरंगाबाद, 19 नोव्हेंबर: औरंगाबाद (Aurangabad) शहरातील मोंढा परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका बारावीच्या तरुणीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट (12th grade student commits suicide) केला आहे. संबंधित मुलगी अभ्यास करण्यासाठी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली होती. तिने अभ्यासाच्या खोलीतच गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभ्यासाच्या ताणातून तिनं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती  पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

सोनाली प्रमोद गवारे असं आत्महत्या करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचं नाव आहे. पीडित मुलगी जुन्या मोंढ्यातील भवानीनगरमध्ये आईवडिल, भाऊ, आजी आजोबा, काका काकू आणि त्यांची मुलं अशा एकत्रित कुटुंबात राहते. ती शहरातील सरस्वती भुवन विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती. मृत सोनालीचे वडील रिक्षाचालक आहेत. तर आई गृहीणी आहे.

हेही वाचा-'आता माझ्याकडे बंदूक असती तर...' धमकी देत NCP आमदाराच्या कानशिलात लगावल्या

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी बुधवारी रात्री मृत सोनाली आपल्या कुटुंबासोबत रात्रीचं जेवण केलं. यावेळी तिने हसत खेळत आपल्या कुटुंबासोबत गप्पा मारल्या. यानंतर अभ्यास करायचा असल्याचं सांगून सोनाली दुसऱ्या मजल्यावर आपल्या खोलीत गेली. काही वेळाने सोनालीच्या भावाला मोबाइल फोन पाहिजे होता, त्यामुळे तो बहिणीकडे वरच्या मजल्यावर गेला. यावेळी त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही.

हेही वाचा-खाल्लं-प्यायलं आणि उलटले; नेत्यांनी पैसे बुडवल्याने व्यावसायिकाची आत्महत्या

बराच वेळ दरवाजा ठोठावूनही आतून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील खोलीकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी दरवाजा तोडला असता, आतमध्ये सोनाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. बंद खोलीत घडलेला हा प्रकार पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच हादरली. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Crime news